ETV Bharat / state

धंगेकरांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी लवकरच AI टेक्नालॉजी, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती - AI Technology - AI TECHNOLOGY

AI Technology : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेते सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हप्ते वसुली संदर्भात केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत, असं मत विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांना मांडलं आहे. पब आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेत गैरप्रकार घडत असतील तर यावर वचक ठेवण्यासाठी AI टेक्नालॉजी वापरली जाईल, असंही स्पष्टीकरण देसाईंनी दिलयं.

AI Technology
शंभूराज देसाईंची माहिती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 5:58 PM IST

मुंबई AI Technology : पुण्यात विशाल अग्रवाल या अल्पवयीन आरोपीनं पबमध्ये मद्यपान करून सुसाट गाडी चालवताना दोघांचा बळी घेतला. यानंतर पुण्यातील अवैध पब, बार आणि दारू दुकानांचा प्रश्न चर्चेत आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेते सुषमा अंधारे यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक देत आंदोलन केलं. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे कसे हप्ते वसुली करतात, याची यादीच वाचून दाखवली. यावेळी त्यांनी काही आरोपही केले. दरम्यान, या सर्व आरोपांचं खंडन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलय. तसंच हे सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यादी स्वतःच्या पत्रावर लिहून द्यावी : पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, ज्या लोकप्रतिनिधींनी राज्य उत्पादन शुल्कात वसुली चालते आणि अधिकारी हप्ते घेतात असे आरोप केलेत, त्याच्यात काही तथ्य नाही. अर्धा टक्का जरी याच्यात खरं असेल तर वरिष्ठ पातळीवर समिती गठीत करून याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यांनी दिलेली यादी कोणीही साध्या पेपरवर लिहून देऊ शकते. त्याच्यात काही अर्थ नाही; परंतु लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पत्रावर लेटरहेडवर ही यादी लिहून द्यावी, असं आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना दिलं.

AI चा प्रस्ताव आणणार : राज्य उत्पादन शुल्क यांनी मागील काही दिवसात देशी दारूची दुकानं, दारूची दुकानं, वाईन शॉप आणि पब यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मागील दोन वर्षांत वाढ झाली आहे. एकीकडे आरोप जे करतात त्यांनी जे अवैध दारूचे धंदे, पब आणि बार सुरू आहेत त्यांच्यावर झालेली कारवाई यांच्याकडे पण लक्ष द्यावे, असा टोला विरोधकांना लगावला. तसंच जी ठराविक वेळ आखून दिली आहे त्या वेळेतच दारूची दुकानं, बार किंवा पब चालू ठेवण्याची नियमावली आहे; परंतु काही चालक-मालक हे वेळ पाळत नाहीत. यावर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग कडक कारवाई करणार असून, AI चा प्रस्ताव विभागाने मांडला आहे. याचं कालच प्रेझेंटेशन झालं आहे आणि लोकसभा निवडणुकीचा 4 जूनला निकाल लागल्यानंतर हा प्रस्ताव अंमलात येईल, असे शंभूराज देसाई म्हणाले.

काय आहे AI प्रस्ताव : पुणे जिल्ह्यात दारूची दुकानं, पब किंवा बार हे वेळ पाळत नाहीत. रात्री उशिरापर्यंत पब आणि बार सुरू ठेवतात; परंतु आता असं चालणार नाही. कारण आमच्या विभागाने AI प्रस्ताव आणला आहे. म्हणजे AI सॉफ्टवेअर सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी कनेक्ट असेल. त्याचप्रमाणे AI सॉफ्टवेअर तसंच सीसीटीव्ही कॅमेरा हे राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांना यांच्यासोबत लिंक असेल. त्यामुळे कुणी किती वाजता, किती वाजेपर्यंत पब किंवा बार सुरू ठेवला आहे ते समजेल. शिवाय नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, अशी शंभूराज देसाई यांनी AI च्या प्रस्तावाबद्दल माहिती दिली.

चुकीचं असेल तर कारवाई व्हावी : 20 मे रोजी मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, वीज खंडित असे प्रकार घडले. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेत या प्रकाराबद्दल निवडणूक आयोगावर टीका करत, वेळ वाढवून मिळावी अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती; मात्र आचारसंहितेचा भंग केला म्हणून भाजपाने नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. याचा आता केंद्रीय निवडणूक आयोगाने अहवाल तयार केला असून यावर लवकरच निर्णय देणार आहे. यावर बोलताना देसाई म्हणाले की, जर उद्धव ठाकरेंनी काही चुकीचं वक्तव्य केलं असेल किंवा चुकीचं बोलले असतील तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई होईल; परंतु काही चुकीचं नसेल किंवा आचारसंहितेचा भंग केला नसेल तर कारवाईचा काय प्रश्नच येत नाही, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

हेही वाचा :

  1. पुणे हादरलं! जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न - Pune Crime News
  2. मुंबईकरांचे 'मेगा'हाल; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन - Central Railway Jumbo Mega Block
  3. लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी मनोज जरांगेंची मोठी घोषणा; विधानसभेच्या सगळ्या जागा लढणार - vidhansabha election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.