ETV Bharat / state

महाराष्ट्रात महायुतीला एक्केचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील - दीपक केसरकर - Deepak Kesarkar Claims - DEEPAK KESARKAR CLAIMS

Deepak Kesarkar Claims : महाराष्ट्रात चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळाल्या पाहीजे असा अंदाज बांधता येत नाही. मात्र ज्या पध्दतीने मतदान झालं त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला एक्केचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील असा अंदाज असल्याचं मंत्री दीपक केसरकर शिर्डीत म्हणाले आहे.

Deepak Kesarkar Claims
दीपक केसरकर (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 8:25 PM IST

शिर्डी (अहमदनगर) Deepak Kesarkar Claims : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज (23 मे) शिर्डीत येऊन साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावलीय. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तीस वर्षातलं हायेस्ट सेंकड मतदान मुंबईत झाले आहे. सर्वसाधारण पणे मागच्या निवडणुकीला किती मतदान झाले होते. हेतुपुरस्सर मतदान धिम केलं गेलं हा आरोप चुकीचा आहे. मतदान स्लो सुरू असल्याने आम्ही सकाळीच तक्रार दाखल केली होती, असं केसरकर म्हणाले आहेत.

दीपक केसरकर लोकसभेच्या निकालाविषयी मत मांडताना (REporter)

आमच्या सीट निवडून येणार - केसरकर : गजानन कीर्तिकर यांनी त्याच्या मुलाचा प्रचार केला की नाही मला माहिती नाही; मात्र ते प्रचारा पासून अलिप्त होते. हे युध्द महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी होते. त्यांनी उतरायला हवं होतं. मात्र आता निवडणूक झाली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करणं योग्य नाही. मुख्यमंत्री जे काय निर्णय घ्यायचे ते घेतील, किर्तिकरांसह सर्वांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करतील. ते ज्येष्ठ नेते आहे. त्यांनी आमचा पक्ष, संघटना बांधण्यात मोठं काम केलं आहे. आमची सीट निवडूण येणार असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याची वेळ येणार नाही असेही दीपक केसरकर म्हणाले आहे.

निवडणुकीत फतवे काढल्यावरून टीका : निवडणुकीत फतवे काढले गेले. असे फतवे काढून मतदान करणारी लोकं वगळा आणि मग एकतरी सीट महाराष्ट्रात निवडूण येते का बघा! मोदी बद्दलच्या नाराजीचा विषय नाही. आपण आपली तत्त्वे सोडायची. निवडणुकीत जे अलाऊड नसते. ते करायचे आणि ती जणु काही आपलीच मते आहेत असे भासवायचे ही राजकीय चाल आहे. हे कितपत योग्य मी सांगू शकत नाही. फतवे काढणे हे लोकशाही विरोधी आहे. त्याची चौकशी झाली पाहीजे. असे फतवे किती ठिकाणी काढले गेले त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे असल्याचं केसरकर म्हणाले आहे.

कॉंग्रेसची ध्येय धोरणं वेगळी : विशाल पाटील यांची अशी अपेक्षा आहे का कॉंग्रेस त्याच्या बरोबर कायम राहील; मात्र कॉंग्रेस निवडणुकीनंतर आपल्या धोरणानुसार चालते हे दिसून येईल. कॉंग्रेसची ध्येय धोरणं वेगळी आहेत. यावेळी त्याचा पराभव होईल. मात्र ते पुन्हा निवडणुकीची तयारी करतील. उध्दव ठाकरे यांचं अस्तित्व केवळ महाराष्ट्रापुरतं आणि मुंबई पुरत आहे. त्यामुळे ठाकरेंनी कॉंग्रेस बरोबर जाऊन चूक केलेली आहे. येणारा काळ त्यांना माफ करणार नाही. कोणाच्या मनात काय होतं हे सांगता येत नाही; मात्र मला सांगण्यात आल होतं. आपल्याला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला आहे. मात्र मी आणि अमित शाह एका सभेच्या निमित्त एकत्र होतो. त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की, असा शब्द दिलेला नव्हता. मात्र लोकांची दिशाभूल करायचं काम ठाकरेंनी केलं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीच्या बचाव कार्यासाठी गेलेल्या एसडीआरफची बोट उलटली, तीन जवानांचा मृत्यू - Pravara River SDRF Boat
  2. उजनी जलशायात बेपत्ता झालेल्या सहा जणांचे सापडले मृतदेह, नातेवाईकांचा आक्रोश - Ujani Jalshaya
  3. मनोरुग तरुण रेल्वेच्या छतावर चढला, 'हे' कारण आले समोर - Pune railway station news

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.