ETV Bharat / state

छगन भुजबळांच्या 'त्या' पोस्टमुळे शिंदे -पवार गटात जुंपली - SAMEER BHUJBAL

नांदगाव -मनमाड मतदारसंघात महायुतीच्या घटकपक्षाचे अर्थात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे हे आमदार आहेत, तिथून भुजबळांनी पुतण्या समीरला थेट लढण्याचे संकेत दिल्याने शिंदे-पवार गटात जुंपलीय.

Chhagan Bhujbal and Sameer Bhujbal
छगन भुजबळ अन् समीर भुजबळ (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2024, 2:27 PM IST

Updated : Oct 10, 2024, 4:18 PM IST

नाशिक- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत, अशातच आता महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून युद्ध भडकण्याची चिन्हं दिसू लागलीत. मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे संकेत दिलेत, भुजबळांनी समीर भुजबळ यांना फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना समीर नाशिक आणि नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, असं म्हटलंय. या पोस्टने खळबळ उडून दिली असून, नांदगाव-मनमाड मतदारसंघावर अप्रत्यक्षपणे भुजबळांनी दावा सांगितलाय.

समीर यांना मतदारसंघातून थेट लढण्याचे संकेत : नांदगाव -मनमाड मतदारसंघात महायुतीच्या घटक पक्षाचे अर्थात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे हे आमदार आहेत, असं असताना भुजबळांनी पुतण्या समीर यांना या मतदारसंघातून थेट लढण्याचे संकेत दिल्याने शिंदे-पवार गटात जुंपलीय. ही जागा शिवसेनेची असून, आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर उचित होईल का? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी भुजबळ यांना विचारल्याने महायुतीतील या दोन पक्षातील संबंध चांगले ताणले गेलेत. राज्यात महायुतीत भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचा समावेश आहे, अशात आगामी विधानसभा निवडणूक महायुतीकडून एकत्रित लढण्याची तयारी सुरू असताना नाशिकमध्ये मात्र महायुतीतील अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील वादाला तोंड फुटलंय.

भुजबळांनी काय दिल्या शुभेच्छा?: नाशिक जिल्ह्याच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही ते सक्षमपणे सांभाळत आलेत. त्यांची अभ्यासू आणि मेहनती वृत्ती, नावीन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर कामाचा ठसा उमटविलाय. आगामी काळातही ते अशाच पद्धतीने ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास आहे.

शुभेच्छा म्हणजे संकेत नव्हे : वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा म्हणजे समीर भुजबळांच्या उमेदवारीचे संकेत नाहीत. महायुतीसाठी तिन्ही पक्ष एकत्रित काम करीत आहेत, महायुतीचे जेवढे गड आहेत, तेवढे आम्ही निवडून आणू, अशात ते गडावर देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले असल्याची माहिती समीर भुजबळ यांचे नाव न घेता भुजबळांनी दिली.

उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवेन : राजकारणात निवडणूक लढविण्याची कोणाला इच्छा नसते. नांदगावमधून महायुतीची उमेदवारी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवेन, असे स्पष्टीकरण माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिलेत. वाढदिवसानिमित्त समीर भुजबळ यांच्यावर मनमाड-नांदगावकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय, पत्रकारांशी बोलताना समीर भुजबळ यांनी उमेदवारीबाबत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख एकत्रित येऊन निर्णय घेणार असून, तो निर्णय सर्वांना मान्य असेल, अशी भूमिका मांडली.

वर्चस्वासाठी भुजबळांचा हट्ट : मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे दोन टर्म नांदगावचे आमदार होते, 2019 मध्ये सुहास कांदे यांनी त्यांना पराभूत केले, छगन भुजबळ त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना इथून उमेदवारी देऊ इच्छितात, लोकसभेच्या वेळी अमित शाहांनी छगन भुजबळ यांना नाशिकमधून तिकीट देण्याचा शब्द दिला होता, पण शिंदे शिवसेनेने हेमंत गोडसे यांचे नाव पुढे केले, अशात गोडसे यांचा पराभव झाला आणि भुजबळांची संधी हुकली, याचा भुजबळांना राग आला असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा -

  1. रमेश कदम, बाळा भेगडे, विवेक कोल्हे...; शरद पवारांचे जुने मावळे पुन्हा 'तुतारी' फुंकणार
  2. सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अख्खा पक्षच विलीन - BRS NCP Sharad Pawar

Last Updated : Oct 10, 2024, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.