ETV Bharat / state

मेळघाटात गवळी बांधवांची अनोखी प्रथा; आठवड्यातून एक दिवस दूधच विकत नाहीत - Amravati News

Amravati News : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांसोबतच मोठ्या संख्येनं गवळी समाज खूप काळापासून राहतोय. विशेष म्हणजे मेळघाटातील दुर्गम भागात शेतीसह गायी आणि म्हशींचं पालन हा गवळी बांधवांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळं त्यांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. परंतु गवळी बांधव आठवड्यातून एक दिवस दूधच विकत नाहीत.

Amravti News
गवळी बांधवांची अनोखी प्रथा (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 7:45 PM IST

अमरावती Amravati News : सातपुडा पर्वत रांगेत वसलेले मेळघाट हे नैसर्गिक वैशिष्टांसह तिथल्या आदिवासी आणि गवळी बांधवांनी जपलेल्या विविध चालीरीती आणि परंपरेसाठी देखील ओळखलं जातं. मेळघाटात अनेक काळापासून वसलेल्या गवळी बांधवांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. प्रत्येक कुटुंबाची एक कुळदैवत आहे. या कुळदैवतचा एक दिवस म्हणून विशिष्ट दिवशी गवळी बांधव आपल्याकडं असणाऱ्या दुधाची विक्रीच करत नाहीत. त्यादिवशी कितीही दूध असलं तरी ते घराबाहेर विकत नाहीत. गवळी बांधवांच्या या आगळ्यावेगळ्या परंपरेसंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रथेचं वैशिष्ट्य आणि महत्व धार्मिक दृष्टीनं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही उपयुक्त असल्याचं लक्षात आलं आहे.

मेळघाटात गवळी बांधवांची अनोखी प्रथा (ETV BHARAT Reporter)

कुटुंबात वैदा काढण्याची परंपरा : गवळी समाजात वैदा काढण्याची परंपरा आहे. आपल्या कुळदैवतेच्या नावानं हा वैदा काढला जातो. गवळी समाजातील कुटुंबात इंजाबाई, आशदेवी, एकवीरा देवी या कुळदैवता आहे. या देवींचा एक दिवस म्हणून त्यादिवशी घरात कितीही दूध असलं तरी ते विकायचं नाही असा नियम कुटुंबाचा आहे. शनिवारी कुटुंबामध्ये "इंजा देवी"ची पूजा होते. त्यामुळं त्या दिवशी घरात कितीही दूध असलं तरी ते विकलं जात नाही. येवले कुटुंबाची कुळदैवता "एकवीरा देवी" आहे. त्यामुळं येवले कुटुंबात रविवारी दूध विक्री होत नाही. तर खंडारे कुटुंबात सोमवारी दूध विकलं जात नाही.

दुधाची पवित्रता जपण्याचा प्रयत्न : गवळी बांधव दुधाला अतिशय पवित्र मानतात. कुलदैवतेच्या पूजेच्या दिवशी दुधाचं पावित्र्य जपलं जावं याची गवळी बांधव पूर्ण काळजी घेतात. या दिवशी घरातलं दूध कोणाला दिलं तर पुढची व्यक्ती ज्या भांड्यामध्ये दूध घेतात ते भांडं धुताना त्याचं पाणी कुठेही फेकून दिलं जातं. यामुळं असं होऊ नये यासाठी गवळी बांधव बाहेर कोणालाही त्या दिवशी दूध देण्याचं टाळतात. दुधाचा एक थेंब असो किंवा दुधाचं भांडं धुतल्यावर त्यातलं पाणी हे चुकीच्या ठिकाणी जाऊ नये याची काळजी घेत दुधाचं पावित्र्य जपलं जात असल्याची माहिती, गावातील रहिवासी संगीता गजानन येवले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. आमच्याकडं गावातील दूध उत्पादकांसह लगतच्या गावातील दूध उत्पादकांकडून दिवसाला 400 ते 500 लिटर दूध येतं. या दुधाची आम्ही मेळघाटच्या बाहेर विक्री करतो. शनिवारी मात्र आम्ही या दुधाची खरेदी देखील करीत नाही असं देखील संगीता येवले यांनी सांगितलं.

'त्या' दुधाचे घरातच बनतात पदार्थ : देवीच्या नावाने ज्या दिवशी दूध विक्री केली जात नाही त्या दिवशी, घरात सकाळी 12 ते 15 लिटर आणि सायंकाळी 12 ते 15 लिटर दूध येतं. या दुधाची विक्री केली जात नसली तरी, त्या दिवशी घरात कोणी पाहुणे आले तर त्यांना आवर्जून हे दूध प्यायला दिलं जातं. घरातील प्रत्येक सदस्य त्या दिवशी भरपूर दूध पितात. यासह दुधाचा खवा तयार केला जातो. हा खवा तयार झाल्यावर तो दुसऱ्या दिवशीपासून विकल्या जातो. एकूणच ज्या दिवशी दुधाची विक्री होत नाही त्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीला भरपूर दूध प्यायला मिळतं. खव्याची विक्री करून चांगला पैसा देखील कुटुंबाला मिळतो.

मेळघाटात या भागात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन : मेळघाटातील गवळी बांधवांच्या दुधाचे वैशिष्ट्य म्हणजे या भागात दुधात पाणी मिसळले जात नाही. जंगलातील चारा हेच मेघाटातील गाई म्हशींचं खाद्य असल्यामुळं दूध देखील पौष्टिक राहतं. मोथा, सेमाडोह, हरीसाल, माखला, काटकुंभ, चुर्णी, हात्रु, गोलाई यासोबतच चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावर मधातच येणाऱ्या मध्य प्रदेशातील कोकरू या गावात मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं. यामुळं येथे खवा, लोणी आणि ताक देखील प्रसिद्ध आहे.

मेळघाटात रबडी आहे प्रसिद्ध : चिखलदरा किंवा सेमाडोह कोलकास मार्गावर अनेक ठिकाणी रबडीचे खास हॉटेल पर्यटकांसाठी थाटले आहेत. या भागातील पौष्टिक आणि चवदार दुधाची रबडी मेळघाटात प्रसिद्ध आहे. पूर्वी परतवाडा ते धारणी मार्गावरील सेमाडोह या ठिकाणी रबडीचे एकमेव ठिकाण होते. सेमाडोह येथील रबडी खाण्यासाठी या मार्गावरून मध्य प्रदेशात इंदोरकडं जाणाऱ्या एसटी बससह सर्वच गाड्या खास रबडी खाण्यासाठी थांबायचा. आज देखील सेमाडोह येथील रबडी प्रसिद्ध आहे. गवळी बांधवांच्या घरातील दूध मोठ्या प्रमाणात सेमाडोहला येते. यासह परतवाडा अंजनगाव सुर्जी, चंदर बाजार आणि मध्य प्रदेशातील शहरांमध्ये मेघाटातील दूध मोठ्या प्रमाणात जातं.

हेही वाचा -

  1. मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी; गुरांना चारा, पाणी मिळावं यासाठी सहा महिन्यासाठी केलं होतं स्थलांतर - CATTLE OWNERS RETURNED IN MELGHAT
  2. मेळघाटात अनेकांनी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री घेतला निसर्ग अनुभव, कोणाला दिसला वाघ तर अनेकांना दिसले रानगवे - Melghat Tiger Reserve
  3. मेळघाटात चक्क आंब्याचं गाव! आंब्यानं बहरला आमझरी परिसर, काय आहेत गावाची वैशिष्ट्ये - Mango Village

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.