ETV Bharat / state

मायानगरीत घ्या घर! म्हाडा मुंबई मंडळाकडून 2030 सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर - mhada lottery mumbai 2024 - MHADA LOTTERY MUMBAI 2024

मुंबईत स्वतःचं घर असण्याचं स्वप्न असूनही अनेकांना शक्य होत नाही. हे स्वप्न साकार करण्याची संधी आता प्रत्येकाला मिळणार आहे. कारण म्हाडाकडून 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, घरांची संख्या आणि म्हाडाच्या घर सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

mhada lottery mumbai 2024
mhada lottery mumbai 2024 (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 8:25 PM IST

Updated : Aug 7, 2024, 9:55 PM IST

मुंबई - स्वस्त आणि खिशाला परवडणाऱ्या म्हाडाच्या सोडतीकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या असतात. म्हाडाच्या 2030 घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून गो लाईव्हच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या प्रक्रियेची सुरुवात म्हाडा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे.

2,030 घरांची होणार सोडत मुंबईमधील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 घरांची सोडत जाहीर झाली आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यात सदनिकाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

असे आहे उत्पन्नाचे गट वर्गीकरण

  • अत्यल्प उत्पन्न गट - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये मर्यादा.
  • अल्प उत्पन्न गट - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपये मर्यादा.
  • मध्यम उत्पन्न गट - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये मर्यादा.
  • उच्च उत्पन्न गट - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न.

म्हाडाच्या घर खरेदीकरिता या आहेत महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज नोंदणी कशाप्रकारे करायचा याबाबतची लिंक दुपारी बारानंतर मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तर ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची मुदत रात्री 11.59 वाजेपर्यंत राहणार आहे.
  • 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • 10 सप्टेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत ऑनलाइन हरकत दाखल करण्यासाठी मुदत असणार आहे.
  • सोडतीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची अंतिम यादी 11 सप्टेंबरला संध्याकाळी 6:00 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • 13 सप्टेंबरला रोजी सकाळी 11 वाजता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
  • सोडतीचे ठिकाण लवकरच म्हाडातर्फे जाहीर केले जाणार आहे.

ऑनलाईनसह ॲपद्वारेही भरता येणार अर्ज- म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android)अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाकडून कोणीही प्रतिनिधी सल्लागार अथवा प्रॉपर्टी एजंट नेमलेला नाही. त्यामुळे अर्जदारानं कोणत्याही व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये. फसवणुकीस म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारचे आवाहनदेखील म्हाडातर्फे करण्यात आलं आहे.

हेही वाचा-

Last Updated : Aug 7, 2024, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.