ETV Bharat / state

मेळघाट मतदारसंघात महायुतीत मारामारी, महाविकास आघाडीची शांततेत तयारी - MELGHAT ASSEMBLY CONSTITUENCY

विदर्भातील मेळघाट हा एक दुर्गम मतदारसंघ या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकत यावेळी चांगलीच चुरस होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहूया या मतदारसंघाची ओळख.

ज्योती सोळंके, डॉक्टर चिमोटे, केवलारम काळे, राजकुमार पटेल
ज्योती सोळंके, डॉक्टर चिमोटे, केवलारम काळे, राजकुमार पटेल (ईटीव्ही भारत बातमीदार)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2024, 3:30 PM IST

अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असताना राज्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात (MELGHAT ASSEMBLY CONSTITUENCY ) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पाच वर्षांपासून भाजपा पक्षाच्या तीन इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली असताना आता ऐनवेळी महायुतीच्या या जागेवर शिवसेना शिंदे गटानं दावा केल्यामुळं भाजपा गोटात खळबळ उडाली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध करणारे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांच्या 'प्रहार'मधून शिवसेना शिंदे गटात सामील होऊन महायुतीचा चेहरा मेळघाट विधानसभा मतदारसंघात होणार असल्यामुळे महायुतीमध्ये राजकुमार पटेल यांच्याविरुद्ध भाजपाकडून प्रचंड विरोध सुरू झाला. महायुतीमध्ये सध्या शिवसेना की भाजपा अशी मारामारी सुरू असताना महाविकास आघाडीनं मेळघाटात शांततेनं चाचपणी पूर्ण केली. महाविकास आघाडी मधील काँग्रेससाठी मेळघाट मतदार संघ सुटेल. एकूणच महायुती मधील भानगडी आणि महाआघाडीतून नेमका कोण उमेदवार निश्चित होईल याकडे सध्या मेळघाटातील मतदारांचं लक्ष लागलं आहे.

असा आहे मेळघाट विधानसभा मतदारसंघ - सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात बहुसंख्य आदिवासी राहतात. यामुळे मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांमध्ये मेळघाट विस्तारला असून मेळघाट विधानसभा मतदारसंघातील काही गावं ही अचलपूर तालुक्यात देखील येतात. 1962 ते 2019 पर्यंत झालेल्या विधानसभेच्या एकूण बारा निवडणुकींमध्ये मेळघाटात सातवेळा काँग्रेसनं बाजी मारली. भाजपानं या मतदारसंघात तीनवेळा झेंडा फडकवला. एकदा अपक्ष उमेदवारानं आमदारकी मिळवली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार म्हणून 2019 मध्ये राजकुमार पटेल हे विजयी झाले.

राजकुमार पटेलांमुळे महायुतीत धुसफूस - अनेक निवडणुकांपासून मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा भाजपाकडे आहे. 1995 च्या निवडणुकीत भाजपाचे पटल्या गुरुजी मावसकर हे मेघाटातून निवडून आले. विद्यमान आमदार राजकुमार पटेल हे भाजपाचे आमदार म्हणून 1999 मध्ये विजयी झालेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर प्रभुदास भिलावेकर यांनी मेळघाटात कमळ फुलवलं. 2019 च्या निवडणुकीत राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. 2019 पासून सलग पाच वर्षे आमदार बच्चू कडू आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यात सतत खटके उडायचे. राजकुमार पटेल यांनी देखील नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्यानं भूमिका घेतली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवासाठी बच्चू कडू यांच्यासोबतच राजकुमार पटेल यांनी देखील मोठी ताकद लावली. आता राजकुमार पटेल हे महायुतीतील शिवसेना शिंदे गटात सामील झाले असून शिवसेना शिंदे घटानं मेळघाटच्या जागेवर दावा केला असून राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळणार असं बोललं जातय. दरम्यान मेळघाटची जागा काहीही झालं तरी शिवसेना शिंदे गटाला सुटू नये आणि आमदार राजकुमार पटेल हे तर महायुतीचे उमेदवार मुळीच नकोत अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली. मेळघाटातून भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी वर्षभरापूर्वीच काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आमदार केवलराम काळे यांच्यासह भाजपाशी एकनिष्ठ असणारे प्रभुदास भिलावेकर, ज्योती सोळंके, रेखा मावसकर हे गत अडीच तीन वर्षांपासून मतदार संघात सक्रिय आहेत. ऐनवेळी आता राजकुमार पटेल हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगायला लागल्यानं मेळघाटात भाजपाचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.

लोकसभा निवडणुकीत अशी मिळाली मतं -

  • नवनीत राणा ( भाजपा) 1 लाख 1,154
  • बळवंत वानखडे (काँग्रेस) 79 हजार 559
  • दिनेश बुब (प्रहार ) 10 हजार 256
  • नोटा 433

काँग्रेस मधून 'हे' आहेत इच्छुक - मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा खरंतर काँग्रेसचा हक्काचा मतदार संघ होता. पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी मेळघाटात तीन दिवस केलेला मुक्काम आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये असणारा आदरभाव आज देखील बऱ्याच अंशी कायम आहे. असं असताना 1995, 1999 आणि 2014 च्या निवडणुकीत मेळघाटात भाजपानं मारलेली बाजी ही काँग्रेससाठी चिंतेची बाब. आता काँग्रेसच्या वतीनं मेळघाट विधानसभा मतदारसंघात डॉ. हेमंत चिमोटे यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं सांगितलं जातं. यासोबतच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात आघाडी घेणारे मुन्ना दारसिंबे, राम चव्हाण, रवी पटेल, दयाराम काळे यांची नावं देखील चर्चेत आहेत.

मेळघाटात अशी आहे मतदार संख्या

  • पुरुष मतदार : एक लाख 53, 800
  • महिला मतदार: एक लाख 46 , 129
  • इतर मतदार : 11
  • एकूण मतदार : दोन लाख 99, 940

मेळघाटात आहेत 'या' समस्या - चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या मेळघाटात एकूण 314 गावं आहेत. यापैकी अनेक गावं ही अतिशय दुर्गम भागात वसली असून अनेक गावांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई मेळघाटात आहे. वैद्यकीय सेवा देखील बऱ्याच गावात उपलब्ध नाही. पावसाळ्यात तर 100 च्या वर गावांचा संपर्क अनेकदा जगाशी तुटून जातो अशी अवस्था आज देखील आहे. मेळघाटातून अनेक गावं ही मेळघाट बाहेर विस्थापित होणार असं कारण गत वीस-पंचवीस वर्षांपासून सांगत अशा अनेक गावात विकासात्मक योजनाच आणल्या जात नाहीत. शिक्षणाचा प्रचंड अभाव आणि रोजगार उपलब्ध नसल्यानं अनेक कुटुंबं मेळघाटबाहेर अमरावती, अकोला, नागपूरसह थेट नाशिक, पुणे आणि मुंबईपर्यंत मजुरीसाठी जातात. आई-वडील दोघेही मजुरीसाठी बाहेर जात असल्यामुळं त्यांची लहान मुलं घरी आजी आजोबाजवळ तर अनेकदा एकटीच राहतात. चिखलदरा आणि धारणी ही तालुक्याची ठिकाणं सोडली तर मेळघाटात इंटरनेट सेवा उपलब्ध नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.