ETV Bharat / state

एमबीबीएस करुन डॉक्टर व्हायचं; मग ही बातमी आहे खास तुमच्यासाठी, जाणून परदेशात कशा आहेत एमबीबीएस प्रवेशाच्या संधी - MBBS Admission Guidance Seminar - MBBS ADMISSION GUIDANCE SEMINAR

MBBS Admission Guidance : सध्या देशात NEET घोटाळ्याचे मोठे रॅकेट असल्याचं उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यावरुन एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी कोणत्या पातळीवर जाऊ शकतात, याची प्रचिती आली. मात्र तुम्हाला जर प्रामाणिकपणे एमबीबीएस करुन डॉक्टर व्हायचं असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

MBBS Admission Guidance Seminar
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 11:16 AM IST

Updated : Jul 3, 2024, 11:30 AM IST

रवींद्र झेंडे (Reporter)

पुणे MBBS Admission Guidance : भारतात एमएमबीबीएससाठी असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगते. अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जॉर्जियामध्ये अत्यंत माफक फीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएस होण्याचं स्वप्न साकारण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या रविवारी सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. जतन फाऊंडेशन, फिनकॉम एज्यु व्हेनचर्स, पॅट्रिक एज्युकेअर यांच्यावतीनं या सेमिनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, जतन फाऊंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी दिली आहे.

पुण्यातील नवी पेठमध्ये होणार सेमिनार : जर्मनीतील जॉर्जियामधील कॉकेशस युनिव्हर्सिटी, ईस्ट वेस्ट युनिव्हर्सिटी आणि बैल्स सी या युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमबीबीएसच्या संधी बाबत सर्व माहिती या सेमिनारमध्ये देण्यात येणार आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रम चार वर्षाचा असून दोन वर्ष इंटर्नशीप असा एकूण सहा वर्षांचा हा कोर्स आहे. एकूण सहा वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सगळा खर्च माफक असून यामध्ये हॉस्टेल, भारतीय जेवण यांचा समावेश आहे. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच जर्मन भाषेचं प्रशिक्षणही देण्यात येते. इथं एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या एफएमजी या परिक्षेची तयारीही करून घेतली जाते.

एमडी कोर्सला मिळू शकते प्रवेश : हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जर्मनीतील एमडी या कोर्सला प्रवेश मिळू शकते. जर्मनीमध्ये सर्व शिक्षण मोफत असते. या शिवाय जोर्जियामध्ये शिकलेले भारतीय डॉक्टर देखील या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी असणार आहेत, अशी माहिती यावेळी जतन फाऊंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी दिली आहे. कोविड काळानंतर जगभरात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे जीएनएम नर्सिंगचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जर्मनीमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी येत्या रवि‌वारी मोफत सेमिनारचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. New 4 MBBS College : राज्यात होणार नवीन चार एमबीबीएस महाविद्यालये; विद्यार्थ्यांच्या वाढणार 400 जागा
  2. आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्याप्रमाणे समान वेतन मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
  3. MBBS Admission Scam : कोल्हापुरातील एससीएसईएस संस्थेत एमबीबीएस प्रवेश घोटाळा, 350 विद्यार्थ्यांची 65 कोटींची फसवणूक

Last Updated : Jul 3, 2024, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.