ETV Bharat / state

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; मरीन ड्राईव्ह पर्यटकांसाठी पुन्हा सज्ज - Marine Drive Opened For Tourist - MARINE DRIVE OPENED FOR TOURIST

Marine Drive Opened For Tourist : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असणारा 'मरीन ड्राईव्ह' (Marine Drive) परिसराचा पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी या पदपथाचा पुरेपूर वापर करता येणार आहे.

Marine Drive
मरीन ड्राईव्ह (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 8:04 PM IST

मुंबई Marine Drive Opened For Tourist : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असणारा 'मरिन ड्राइव्ह' (Marine Drive) येथील पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी हा पदपथ बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता जी. डी. सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपथ आता वापरासाठी पालिकेनं उपलब्ध करून दिला आहे.

दर्जेदार सुविधा देण्यासाठीचे निर्देश : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड अंतर्गत दुसरा बोगदा १० जून रोजी खुला करण्यात आलाय. या परिसरात मोठ्या प्रमाणात येणार्‍या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठीचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या भागात पर्यटकांसाठी प्रसाधनगृह आणि पदपथ स्वच्छतेसाठी नियमितपणे देखरेख ठेवण्यासाठी सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मरीन ड्राईव्हच्या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण या प्रकल्पाच्या निमित्तानं करण्यात आले आहे. त्यामुळं १०.५६ मीटर रूंदीचा आणि सरासरी १ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते मफतलाल क्लब सिग्नल दरम्यान वापरासाठी उपलब्ध झालाय.

नवीन पदपथ तयार : प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर वाहिनीच्या दिशेला रॅम्पला जोडणारा ४०० मीटरचा अंतराचा रस्ता तयार करण्यात आलाय. अतिरिक्त सेवा रस्त्यासोबतच पर्यटकांना पदपथही वापरासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाला आहे. या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी ही बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळं अतिरिक्त भराव न घालताच आतल्या बाजुला हा नवीन पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात आलाय.

लाटांचा वेग रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर : पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर पूर्वीसारखीच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय. तसंच चालण्यासाठी अधिक दर्जेदार पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय पदपथांना लागूनच चांगली प्रकाश व्यवस्था तयार करण्यासाठी, पथदिवे लावण्याचं नियोजन प्रगतिपथावर आहे. मरीन ड्राईव्हच्या सी फेस परिसरात धडकणार्‍या लाटांचा वेग आणि आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण किनारपट्टीवर टेट्रापॉडचा वापर केल्यास लाटांमुळं किनारपट्टीवर होणारा आघात आणि लाटांचा वेग कमी करण्यासाठी मदत होईल. तर मरीन ड्राईव्ह किनारपट्टीवर ५९० मीटर भागात टेट्रापॉडचे काम दक्षिण ते उत्तर अशा दिशेत प्रगतिपथावर आहे.

हेही वाचा -

  1. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून लाखो रुपयांची चोरी, बँक खाते पश्चिम बंगाल आणि चेन्नईतील असल्याची माहिती समोर - Education Department
  2. 'अटल सेतू'नंतर मुंबईकरांना मिळणार 'कोस्टल रोड'चं गिफ्ट; उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
  3. मुख्यमंत्र्यांची निवेदनांवर खोटी स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.