ETV Bharat / state

मराठा समाज खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू; १३ तालुक्यात ६ हजार ६७८ कर्मचारी लागले कामाला

Maratha Reservation : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. (Jarange Patil) नागपूर जिल्ह्यामध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून १३ तालुक्यात ६ हजार ६७८ कर्मचारी कामाला लागले (Lakh Maratha) असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलीय. (Maratha Agitation)

Maratha Reservation
मराठा आरक्षण सर्वे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 4:49 PM IST

नागपूर Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे निघालेला महामोर्चा जसजसा मुंबईच्या जवळ जातो आहे. त्याच प्रमाणे राजकीय घडामोडीही वेगात घडत आहेत. (Maratha Reservation Survey) एकीकडे सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या उद्देशानं फेब्रुवारी महिन्यात मुंबईत विशेष अधिवेशन बोलावलेलं असताना देखील मनोज जरांगे यांना ते मान्यचं नाही. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मराठा समाजातील लोक लाखोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दुसरीकडे राज्य सरकार कडूनही वेगवान हालचालींना सुरूवात झाली आहे.

आयोगाने नेमून दिलेल्या सूचनानुसार सर्वेक्षण : नागपूर जिल्ह्यामध्ये ४ लाख ४२ हजार ८९७ घरातील २२ लाख १४ हजार ४८५ लोकसंख्या तपासली जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने नेमून दिलेल्या सूचनानुसार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केल्यानंतर आजपासून तेराही तालुक्यामध्ये तपासणीला सुरुवात झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये निर्धारित लोकसंख्येची तपासणी करण्यासाठी ६ हजार ६७८ प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे.

नागपूर विभागात लोकसंख्या 1 कोटी १७ लाख ५३ हजार : नागपूर महानगर क्षेत्रासाठी २७ हजार ६३४ घरांची संख्या असून २४ लाख ५ हजार ६५६ लोकसंख्येसाठी ७०५५ प्रगणक ही तपासणी करणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणालाही लवकरच सुरुवात होणार आहे. नागपूर विभागात लोकसंख्या एकूण 1 कोटी १७ लाख ५३ हजार आहे. या लोकसंख्येसाठी २९ हजार ४२ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होईल : राज्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणात बाधा : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे कामात बाधा येत आहे. नागपूर जिल्ह्याच्या १३ तालुक्यात ६ हजार ६७८ कर्मचारी जरी कामाला लागले असले तरी त्यांना यांत्रिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

शिक्षकांमध्ये नाराजी, बहिष्काराचा पवित्रा : जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे. मराठा सर्वेक्षणाचं काम शैक्षणिक नसल्यानं ते काम आम्ही करणार नसल्याचा पवित्रा काही शिक्षक संघटनांनी घेतला आहे. संपूर्ण दिवस सर्वेक्षणाच्या कामात जात असेल तर शाळेतील अध्यापन कधी करायचं असा प्रश्न शिक्षकांनी केलाय. अशा परिस्थितीत शाळा बंद करून सर्वेक्षण करावं लागेल. त्यास आम्ही तयार नसल्याचं शिक्षक म्हणत असल्यानं ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होईल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा:

  1. बँक घोटाळा प्रकरण : रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू, संघर्ष यात्रा काढल्यानं कारवाईचा आरोप
  2. भारत जोडो न्याय यात्रा: राहुल गांधींचा आसामच्या मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल; मल्लिकार्जुन खर्गेंचं अमित शाहांना पत्र
  3. प्रजासत्ताक दिनानिमित्त भेट देण्यासाठी भारतातील 'ही' आहेत ऐतिहासिक ठिकाणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.