मुंबई Maratha Reservation Issue : राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे काढले, आंदोलनं केली आणि आता पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. दरम्यान, शुक्रवारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात येईल, असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं.
काय म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी? : मराठ्यांना जे आरक्षण दिलं आहे, ते सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तसेच फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित्य न राहता देशभर या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठा समाजातील सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी तरतूद सरकारनं केली पाहिजे. वेळ पडली तर घटनेत बदल करावा, पण आरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शुक्रवारी सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत, आरक्षणावर लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं आहे.
कॅबिनेट बैठक कधी होणार? : दुसरीकडे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरील "संघर्षयोद्धा" हा जीवन प्रवास सांगणारा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. आणि काल सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले पाटील यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आपण मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावू. तसेच मंगळवारी मराठा आरक्षण उप समितीतील नेते तसेच मनोज जरांगे पाटील तुमचे प्रतिनिधी या बैठकीला पाठवा आणि बैठकीतून तोडगा काढू, असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं होतं. त्यामुळे येत्या मंगळवारी मराठा आरक्षणावर कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीतून तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
- अज्ञाताने रासायनिक खत टाकल्याने शेतकऱ्याचा २५ टन कांदा सडला, उत्पादक आर्थिक संकटात - Onion Rotted In Jalgaon
- पिकांसाठी वरदान ठरतय खास 'पंचामृत'; जनावरं देखील फिरकत नाहीत शेतात - Buldhana Panchamrut
- ठरलं! विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार; बंडखोरांबाबत घेतला मोठा निर्णय - Mahavikas Aghadi PC