ETV Bharat / state

तर विधानसभा लढविणारच, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा - Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : आतापर्यंत आपण राजकारणात उतरलेलो नाही. पण, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने मराठा समाज उतरेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासह त्यांनी मंत्री धनंजय मुंडे जातीयवाद करत असल्याचा आरोप केलाय.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 5:01 PM IST

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर बोलताना (Reporter)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Manoj Jarange Patil : आता राजकारणात उतरलो नाही; मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. यावेळेस फक्त पाडा म्हणालो नाव घेतलं नाही. विधानसभेच्या वेळी नाव घ्यावं लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तर धनंजय मुंडे जातिवाद करत नाही, असं वाटत होतं; मात्र मागील काही दिवसांपासून ते ज्या पोस्ट करायला लावत आहेत, त्यावरून ते पण जातिवाद करत आहेत असं दिसून येत आहे. मराठा बांधवांनी एक महिना शांत राहावे; पण इतके पण शांत राहू नका, असा इशारा त्यांनी दिलाय.

कोणालाही पाठिंबा नाही : 5 टप्प्यात निवडणूक आहे. मी कुणालाही पाठिंबा दिला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या. ज्यांना पाडायचं त्याला पाडा. नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही. अफवा पसरत आहे. पण आपण पाठिंबा देणार नाही दिला नाही. पण सर्वांना विनंती आहे भावनिक होऊ नका. आपल्या लेकरांच्या बाजूला राहा. आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी राहा. आपल्या लेकरांना न्याय मिळेल त्याला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील, मतांमधून आपली ताकद दाखवा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलय.

समाजाने इतके पण शांत राहू नये : धनंजय मुंडे जातीवाद करत नाही असा मला विश्वास होता. पण आता ते पण करू लागले असं वाटू लागलं. ते पोस्ट करायला लावू लागले. त्यांचे लोक काहीही मेसेज समाज माध्यमांवर पोस्ट करत आहेत; मात्र मराठा समाजाला सांगतो शांत राहा आणि हे काय करतात त्यावर लक्ष ठेवा, एक महिना सहन करा. अन्याय होत असेल तर मग मात्र संरक्षण करा. मी म्हणतो म्हणून शांत नका राहू, तुमचा घात होईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. नारायण गड सभा रद्द झाली. कारण तिथे तयारी नव्हती. दुष्काळ असल्याने पाणी नाही. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहेत, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते. म्हणून सभा पुढे ढकलली अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मराठ्यांनी जातिवाद केला नाही, सुरुवात केली नाही. मला काही म्हणाले शहाणपणाची भूमिका घ्या. मी सर्व समाजाला सांगतो त्यांच्यावरची वेळ गेली आहे. त्यांना भांडण लावायचे आहे. हे मुद्दामहून गुरगुर करणार आहेत. कारण त्यांची वेळ निघून गेली आहे, अशी टीका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.

हेही वाचा :

  1. राम मंदिर निर्माण केलं, आता रामराज्य आणायचं हेच आमचं ध्येय : नितीन गडकरी - Lok Sabha Election 2024
  2. मोदी यांना 'दंश करणारा साप' म्हणत संजय राऊतांचा 'जहरी' हल्लाबोल; राजकीय वातावरण तापणार? - Sanjay Raut
  3. 'इंडिया' आघाडी पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींना अद्यापही नवाज शरीफांच्या केकची आठवण; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले संघावर घालतील बंदी - India Alliance Press Conference

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.