ETV Bharat / state

मुंबईतील 'मानाजी राजुजी चाळ गणेशोत्सव' मंडळाने जपली कबड्डीची परंपरा - Ganeshotsav 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 8:07 PM IST

Ganeshotsav 2024 : मुंबईची कबड्डीची (Kabaddi) परंपरा आजही मुंबईतील एका गणपती मंडळांनं जपली आहे. या गणपती मंडळाचं नाव आहे 'मानाजी राजुजी चाळ गणेशोत्सव मंडळ'. या मंडळाचे हे 90वे वर्ष असले तरी बदलत्या काळानुसार या मंडळानं आपली कबड्डीची परंपरा आजही कायम ठेवली आहे.

Ganeshotsav 2024
मुंबईतील गणपती मंडळ (ETV Bharat Reporter)

मुंबई Ganeshotsav 2024 : मुंबई म्हटलं की, कुणाच्याही डोळ्यासमोर इथली झगमगती दुनिया उभी राहते. इथली फिल्म सिटी, गरवारे स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, महालक्ष्मी रेस कोर्स अशी प्रसिद्ध मैदाने येथे आहेत. मात्र, आज मुंबई क्रिकेटसाठी ओळखली जात असली तरी, कबड्डी हा मुंबईकरांचा डीएनए आहे असं म्हटलं जातं. तर याची सुरुवात झाली गिरणी कामगारांपासून.

गिरणी कामगारांच्या मुंबईला सुरुवात : आज मुंबईला आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणतो. पण, प्राचीन काळापासूनच मुंबई एक व्यापारी शहर राहिलं आहे. कालांतरानं मुंबईवर इंग्रज, पोर्तुगीज यांनी राज्य केलं. व्यापार वाढला तसा काळ ही बदलला, गिरणी आल्या आणि सुरुवात झाली गिरणी कामगारांच्या मुंबईला. हे कर्मचारी सकाळी गिरणीवर जात संध्याकाळचा भोंगा वाजला की, पुन्हा घरी येत. यातूनच कामगार संघटना उभ्या राहिल्या आणि सुरुवात झाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची. या गिरणी कामगारांसाठी ज्या चाळी बांधल्या त्या चाळींचे देखील स्वतःचे गणपती होते. त्यातीलच एक चाळ म्हणजे 'मानाजी राजूजी चाळ'.

कबड्डीची परंपरा ठेवली कायम : आज गणपती म्हटलं की डीजे, नाच-गाणी धांगडधिंगा पहायला मिळतो. मात्र, मुंबईत गिरणी कामगारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले होते. पूर्वी गणपतीत नाटक, कीर्तन, नमन असे पारंपरिक कलाप्रकार सादर केले जायचे. यातच आपले पारंपरिक खेळ देखील होत होते. त्यातीलच एक खेळ म्हणजे कबड्डी. गणपती काळात येथे कबड्डी स्पर्धा भरवल्या जायच्या. काळाच्या ओघात नाटक बंद झाले. सांस्कृतिक कार्यक्रम कमी झाले. मात्र, या मानाजी राजूजी चाळ गणपती उत्सव मंडळाने आजही आपली कबड्डीची परंपरा कायम ठेवली असून, मंडळाकडून आजही कबड्डी स्पर्धांचे आयोजन केलं जातं.

मंडळाने राष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू दिले : या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांनी सांगितलं, "आमच्या मंडळाने राष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू दिले आहेत. 1935 साली आमच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यावेळी बाबाजी जामसंडेकर यांच्यासह त्या वेळेची मोठी मोठी लोकं आमच्या मंडळात होती. त्यांनी या गणपती उत्सवाला सुरुवात केली. आमची चाळच गिरणी कामगारांची. त्यामुळं गणपती उत्सवात गिरणी कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. इथे पूर्वी एक फिनिक्स मिल होती. या मिलमधून आम्हाला गणपतीसाठी वर्गणी मिळायची."

शैक्षणिक साहित्याचं वाटप : "आमचा कबड्डीचा इतिहास आहे. इथून चांगले चांगले कबड्डी प्लेयर तयार झाले आहेत. ज्यांनी पुढे आपल्या देशासाठी खेळ खेळला आहे. दत्ता मालप, अविनाश भालेकर हे आमच्याच चाळीतील खेळाडू. ही परंपरा आजही कायम असून, आजही आम्ही कबड्डी स्पर्धांचे आयोजन करतो. सोबतच इतरही सामाजिक उपक्रम आम्ही सुरू केले असून, गणपती काळात जे काही उत्पन्न मिळेल त्यातून आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो. आरोग्य शिबीर भरवली जातात." अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. ढोल-ताशाच्या गजरात पुणेकराचा गणरायाला निरोप, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा ड्रोन व्हिडिओ - Pune Ganpati Visarjan 2024
  2. राज्यातील विद्यार्थ्यांची सर्वांत मोठी गणेश विसर्जन मिरवणूक; 6000 विद्यार्थ्यांचा सहभाग, पाहा व्हिडिओ - Ganpati Visarjan 2024
  3. लाडक्या गणरायाला आज निरोप... मुंबईत 24,000 हून अधिक पोलीस तैनात - Ganesh visarjan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.