ETV Bharat / state

तलवारीनं केला जीवघेणा हल्ला; तरुणाच्या हाताची तुटली बोटं - THANE CRIME NEWS

ठाण्याच्या राबोडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्येतून एका २४ वर्षीय तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Thane Crime News
तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2024, 10:21 PM IST

Updated : Oct 17, 2024, 10:35 PM IST

ठाणे : ठाण्याच्या राबोडी परिसरातील क्रांतीनगर येथे एका २४ वर्षीय तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न (Crime News) करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अमीन अस्लम बेग असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे (Rabodi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

धारदार शस्त्रानं केला जीवघेणा हल्ला : बुधवारी संध्याकाळी राबोडी क्रांतीनगर परिसरात पूर्ववैमनस्येतून नबाब रहेमतुल्ला शेख (वय- ४० रा.दुसरी राबोडी) आणि नौशाद अली शेख (वय - २० रा. दुसरी राबोडी) आणि इतर दोन आरोपी यांनी तक्रारदार अमीन अस्लम बेग (२४) याच्यावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणायात आला आहे.

हाताची बोटं तुटली : हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला कासारवडवलीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तलवारीच्या वारामुळं जखमी व्यक्तीच्या हाताची बोटे तुटली असून, त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या संपूर्ण प्रकारामुळं राबोडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न : आधीही आशीच एक घटना घडली होती. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेरच सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत कार्यलयाच्या बाहेर घडली होती. या जीवघेणा हल्ल्या प्रकरणी हल्लेखोर मुलासह त्याच्या आई-वडिलांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. बिहारमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजीत खेळ! छठपूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू
  2. Thane Crime News: बायकोला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; नवरा फरार
  3. Thane Crime : रिटायर पोलीस अधिकाऱ्यावर ग्रामपंचायत बाहेरच जीवघेणा हल्ला; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Last Updated : Oct 17, 2024, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.