ETV Bharat / state

अपघातानं केला कुटुंबावर घात; बाप-लेकाचा मृत्यू तर माय-लेकी बचावल्या - Man Son Killed Accident

Mumbai Accident News : मुंबई येथील लालबाग ब्रिजवर एक मोठी दुर्घटना घडलीय. भरवेगात येणार्‍या लान्सर कारच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारची डिव्हायडरला धडक बसली. यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला असून, पत्नीसह चार वर्षांची मुलगी आणि पोलीस शिपाई जखमी झाले आहेत.

Accident News
लालबाग ब्रिजवर अपघात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 8:15 AM IST

मुंबई Mumbai Accident News : लालबाग ब्रिजवरील अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झालाय, तर पत्नीसह चार वर्षांची मुलगी आणि वाहतूक विभागाचे एक पोलीस शिपाई जखमी झाले आहेत. अपघातात सोहेल अख्तर शेख आणि मोहम्मदअली सोहेल शेख यांचा मृत्यू झालाय, तर अस्मा सोहेल शेख, फातिमा शेख आणि दिपक नवल दाभाडे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिलीय.

कारचालकाला केलं अटक : या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन कलम 279, 337, 338, 304 (अ) आणि मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी कारचालक मोहम्मद हमजा इम्तियाज शेख या २१ वर्षांच्या तरुणाला अटक केलीय. दिपक दाभाडे हे वरळीतील जुनी बीडीडी चाळीत राहत असून सध्या ते मरिनड्राईव्ह वाहतूक पोलीस चौकीत पोलीस शिपाई म्हणून काम करतात.

कारने बाईकला दिली धडक : रविवारी रात्री पावणेदहा वाजता पोलीस शिपाई बाईकवरुन लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, ब्रिज, निर्मल पार्कसमोरुन येत होते. यावेळी भरवेगात येणार्‍या लान्सर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला धडकली. काही वेळानंतर कारने समोरील येणार्‍या बाईकला धडक दिली. या अपघातात कार आणि बाईकवरुन प्रवास करणार्‍या पाच जणांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळं जखमींना तातडीने जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे सोहेल शेख, त्यांचा बारा वर्षांचा मुलगा मोहम्मद अली यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर सोहेलची पत्नी अस्मा सोहेल शेख, चार वर्षांची मुलगी फातिमा आणि पोलीस शिपाई दिपक दाभाडे यांच्यावर उपचार सुरु होते.

सोमवारी रात्रीची घटना : प्राथमिक उपचारानंतर या तिघांनाही सोडून देण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कारचा चालक मोहम्मद हमजा शेख याला पोलिसांनी अटक केली. मृत सोहेल शेख हे दादर येथील डीएसपी रोड, मिटवाला चाळीतील रहिवाशी असून अपघाताच्या वेळेस ते त्यांची पत्नी आस्मा, दोन मुले मोहम्मदअली आणि फातिमा यांच्यासोबत घराच्या दिशेने जात होते.

हेही वाचा -

  1. पुणे सोलापूर महामार्गावर अपघात; रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीस्वारानं उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
  2. दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या कारला अपघात; आजोबासह चिमुकल्या नातवाचा मृत्यू
  3. मित्रानं दिलेली पार्टी अखेरची ठरली! ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांनी अपघातात गमावले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.