नाशिक Man Raped On Newly Married Girl : पोटदुखीचा त्रास होत असल्यानं नवविवाहितेला भूतबाधा झाल्याच्या अंधश्रद्धेनं कुटुंबीयांनी एका भोंदू बाबाकडं नेलं. मात्र या कथित भोंदू मौलवीनं नवविवाहितेला उपचाराच्या बहाण्यानं हळदीमधून गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार नाशिक परिसरातील एका गावात घडला आहे. याप्रकरणी नवविवाहितेच्या तक्रारीवरून संशयित कथित भोंदू मौलवीला पोलिसांनी अटक केली आहे. अमीन हुसन अमीन शेख असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या कथित भोंदू मौलवीचं नाव आहे.
पीडित नवविवाहिता पोट दुखीनं त्रस्त : चार महिन्यापूर्वी लग्न झालेली पीडित नवविवाहिता पोट दुखीनं त्रस्त होती. त्यामुळे पोटदुखीनं त्रस्त नवविवाहितेला सासरच्या लोकांनी एका भोंदूगिरी करणाऱ्या स्वयंघोषित मौलानाकडं उपचारासाठी नेलं होतं. यावेळी या कथित मौलवीनं पीडितेला भूतबाधा झाली असून चार दिवस उपचार करावा लागेल. असं सांगितलं. उपचार करण्याचा बनाव करत नराधमानं नवविवाहितेला हळदीतून गुंगीचं औषध देत बंद खोलीत बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरुन भोंदू बाबा अमीन हुसेन अमीन शेख ( वय 32 ) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदिरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
उपचारासाठी भोंदू बाबा थेट घरात : पीडितेचा आजार दूर करण्यासाठी नववाहितेच्या राहत्या घरी उतारा करण्याच्या बहाण्यानं जात होता. त्यानंतर या भोंदूगिरी करणाऱ्या बाबांनं तिच्या सासरचं राहतं घर गाठलं. तिथंही घरातील सर्व व्यक्तींना बाहेर काढून देत, त्यानं एका बंद खोलीत पीडितेवर उपचार करण्याचा बनाव करत तिला बेशुद्ध करून अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा पीडित महिला पतीसोबत बाबाच्या घरी आली. यावेळी त्यानं तिच्या पतीला घराबाहेर थांबण्यास सांगून पीडितेला बंद खोलीत नेऊन बेशुद्ध करत शारीरिक अत्याचार केले. यादरम्यान ती शुद्धीवर आल्यानं बाबाला तिनं विरोध केला. याबाबत कुठंही वाच्यता करू नको, नाहीतर तुझ्या पतीला आणि घरच्यांना मारुन टाकेल, असं धमकावल्यानं पीडिता घाबरून खोलीतून बाहेर पळून आली, असं पीडित नवविवाहितेनं तक्रारीत नमूद केलं आहे.
पीडित नवविवाहितेच्या पतीची आणि भोंदूची झटपट : अत्याचार झाल्यानं पीडितेनं भोंदू मौलानाकडं जाण्यास नकार दिल्यानं तिच्या पतीनं आणि सासरच्या महिलांनी विश्वासात घेत तिची विचारपूस केली. यावेळी नवविवाहितेनं धाडस करून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पती आणि सासरच्या लोकांनी भोंदूकडं जात त्याला जाब विचारला. यावेळी त्यानं पीडितेच्या पतीच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये झटपट झाली. यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कथित मौलवीविरोधात तक्रार दाखल केली.
हेही वाचा :
- 5 वर्षीय चिमुरडीवर 75 वर्षीय नराधमाचा अत्याचार; दोषीला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Thane rape case verdict
- नववीत शिकणाऱ्या मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार, पीडितेच्या कुटुंबीयांना आरोपीकडून धमक्या - Minor Girl Rape Case Beed
- मंदिराच्या पुजाऱ्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या; तिघांना अटक - gang rape