श्रीरामपूर Narcotics Ordered By Post : भारतीय डाकसेवेद्वारे गुवाहाटी येथून श्रीरामपुरात अंमली पदार्थ (हेरॉईन) पार्सलने मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. श्रीरामपूर शहरातील पूर्णावादनगर येथील विक्रांत राऊत यानं हे पार्सल ऑनलाइन मागवल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी NDPS कलमानुसार गुन्हा दाखल करत आरोपीवर कारवाई केली आहे.
अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कुरीअर आणि पोस्टाच्या सेवेचा गैरफायदा केला जात असल्याची विधीमंडळ अधिवेशनात राज्य गृह विभागानं अगोदरच कबुली दिलीय. राज्यभर अंमली पदार्थाचं जाळ पसरलं असून आता नगर जिल्ह्यात देखील अशा पद्धतीनं परराज्यातून ड्रग्ज ऑर्डर केल्या जात असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. ऑनलाइन ड्रग्ज आणि सोशल मीडियामुळं अवघं जग हातात आल्यानं गुन्हेगारीकडं झुकणाऱ्या श्रीरामपुरात असे किती जण ड्रग्जच्या आहारी गेलेत आणि याचं लोन कसं पसरतंय हे तपासण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय.
हेही वाचा -
- निवडणुकीच्या रणधुमाळीत अमली पदार्थ विरोधी पथकाची 'मायानगरी'त मोठी कारवाई; 1 कोटी 34 लाखांचे ड्रग्ज जप्त, सात जणांना अटक - Drugs Seized
- ड्रग्ज मिळून आल्याची बतावणी करत डॉक्टर, उद्योजकाला 31 लाखांचा गंडा - Nashik Crime
- नागपूर विमानतळावर कस्टम्सकडून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक - Narcotics Case Nagpur