ETV Bharat / state

चॅटिंगनं झाली सेटिंग अन् नंतर मिटिंग; लग्नाच्या बहाण्यानं बलात्कार, आरोपी लुधियानातून अटक - Man Arrested Raping Woman - MAN ARRESTED RAPING WOMAN

Man Arrested Raping Woman : लग्नाच्या बहाण्यानं महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी लुधियाना येथून एका आरोपीला अटक करण्यात आली.

Man Arrested Raping Woman
संग्रहित छायाचित्र (Source : ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 10:46 AM IST

Updated : Aug 26, 2024, 12:28 PM IST

मुंबई Man Arrested Raping Woman : लग्नाच्या बहाण्यानं एका 24 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पंजाबमधील लुधियाना येथून एका २६ वर्षीय तरुणाला रविवारी म्हणजेच काल अटक करण्यात आली, अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांनी दिली. याप्रकरणी 21 ऑगस्ट रोजी खार पोलीस ठाण्यात कलम 69, 352, 351(2) आणि हुंडाबंदी अधिनियम कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी पंजाबमधून अटकेत : महिलेच्या तक्रारीवरून मुंबईच्या खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून मुंबईत आणलं. राघव राजेश अग्रवाल असं संशयित आरोपीचं नाव आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट 2024 या कालावधीत लग्नाच्या बहाण्यानं महिलेवर अनेकदा बलात्कार केला, असा आरोप आहे. पीडित महिला आणि आरोपी यांची दिल्लीतील एका कपड्यांच्या प्रदर्शनात भेट झाली होती, अशी माहिती महिलेनं जबाबात दिली.

मुंबई पोलिसांची पंजाबमध्ये कारवाई : महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यानंतर आरोपी अग्रवाल लुधियानामध्ये असल्याचं समजलं. त्यानंतर खार पोलिसांच्या पथकानं आरोपीला लुधियाना येथून अटक करून मुंबईत आणलं.

काय आहे नेमकं प्रकरण? : राघव राजेश अग्रवाल हा व्यावसायिक असून, दिल्लीतील एका कपड्यांच्या प्रदर्शनात तो कपडे खरेदी करत होता. त्यावेळी 24 वर्षीय महिलेशी त्याची ओळख झाली. त्यावेळी दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर शेअर केले. त्यानंतर दोघांत मोबाईलच्या माध्यमातून चॅटिंग, कॉलिंग सुरू झालं. 15 जानेवारी 2023 रोजी राघवनं महिलेला प्रपोज केला. पहिल्या लग्नाबाबत राघवला महिलेनं सर्व हकीकत सांगितली. तरी त्यानं होकार दिल्यानंतर महिलेनं देखील होकार दिला. फेब्रुवारी 2023 रोजी राघव महिलेला भेटण्यासाठी मुंबईमध्ये आला. एअरपोर्टवरून दोघे लोणावळा या ठिकाणी गेले. त्यानंतरही एकदा ते लोणावळ्याला फिरायला गेले होते, अशी माहिती पीडित महिलेने पोलीस जबाबात दिली.

महिलेला दिली धमकी : 8 जानेवारी 2023 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान राघव यानं महिलेचा विश्वास संपादन केला. लग्न करणार असं सांगून महिलेकडं पैशांची मागणी केली. तसंच त्यानं वारंवार महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी तो गायब झाला. कोणताही संपर्क साधल्यास दोघांचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्यानं महिलेला शिवीगाळ केली, अशी माहिती पीडित महिलेनं जबाबात दिली.

वरील सर्व माहिती ही पीडित महिलेनं पोलीस जबाबात दिली.

हेही वाचा -

  1. "महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन", शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य - Amravati Hindu Morcha
  2. पोक्सो गुन्ह्यातील नराधमानं जामीनावर सुटल्यावर दिला पीडितेला त्रास; अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपीला अटक - Satara Minor Girl Suicide
  3. अल्पवयीन प्रेयसीचं अपहरण करुन बलात्कार: प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Man Kidnapped Minor Girl And Raped

Last Updated : Aug 26, 2024, 12:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.