ETV Bharat / state

नाशिकात अग्नितांडव! 70 पेक्षा जास्त वाहनं जळून खाक; अनेक घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी - Major Fire in Nashik

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 9:44 AM IST

Updated : Apr 22, 2024, 11:05 AM IST

Major Fire in Nashik : नाशिक शहरात भीषण आग लागली असून यात अनेक घरं जळून खाक झाल्याचं समोर येतंय. दुचाकीच्या दुकानाला ही आग लागल्यानंतर शेजारच्या गोडाऊनमध्ये पसरली. त्यानंतर घरांनाही आगीनं घेरलं.

Major Fire in Nashik
नाशिकात अग्नितांडव! अनेक घरं आगिच्या भक्ष्यस्थानी, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

नाशिकात अग्नितांडव! 70 पेक्षा जास्त वाहनं जळून खाक

नाशिक Major Fire in Nashik : नाशिकच्या जुने नाशिक भागात आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास दुचाकी वाहन खरेदी विक्री गोदाम आणि घरांना आग लागली. या आगीत 70 पेक्षा अधिक दुचाक्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या दहा बंबांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळं लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.

सकाळी साडेसात वाजता, जुन्या नाशिकमधील चौक मंडल इथं आग लागल्याची घटना कळवली. यावेळी वाहनाचं गॅरेजला आग लागली. त्यामुळे चप्पलचं गोडाऊन आणि चार घरांना आग लागली. त्याला खेटून आग इतर परिसरात आग पसरली. सध्या नाशिकमधील सहा अग्निशमन दलाचे 9 बंब घटनास्थळावर कार्यरत आहेत. सध्या आग कशानं लागली, याबाबत तपास सुरू आहे. माहिती घेतल्यानंतर आगीचं नेमकं कारण काय आहे, याबाबत सविस्तर माहिती कळेल. - किशोर बैरागी, अग्निशमन दल अधिकारी

नाशिकच्या जुने नाशिक भागात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. या भागात असलेल्या दुचाकी वाहन खरेदी विक्रीच्या गोदामाला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात रशीद खान यांच्या मालकीच्या गोदामामधील सत्तरहून अधिक दुचाक्या पूर्णहतः जळून खाक झाल्या. यानंतर आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि गोदामाच्या मागच्या बाजूस असलेली तीन घरं यात जळून खाक झाली. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी यात करोडो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र ही आग कशामुळं लागली, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा :

  1. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग; परिसरात धुराचे लोट - Mumbai BJP Office Fire
  2. भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग; 100 पेक्षा जास्त दुकानं आगीत भस्मसात - Fire Breaks Out in Pimpri Chinchwad
  3. जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग; अनेक कर्मचारी जखमी, पाहा व्हिडिओ - Fire in Jalgaon MIDC

Last Updated : Apr 22, 2024, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.