मुंबई Maharashtra Weather Update : मुंबईत पावसानं उकड्यापासून नागरिकांना दिलासा दिला असला तरी अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांच्या अडचणीत वाढ झालीय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात किनारी भागात अनुकूल परिस्थितीमुळं मान्सून रविवारी मुंबईत नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी पोहोचलाय. मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय. मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून, गेल्या 24 तासांत शहरातील अनेक भागात 150 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालीय.
मुंबईत वादळाची शक्यता : मुसळधार पावसामुळं भायखळा, सायन, दादर, माझगाव, कुर्ला, विक्रोळी आणि अंधेरी यांसारख्या अनेक भागात पाणी साचलं होतं. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आणि वाहतूक कोंडी झाली होती. यासोबतच मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसासह वादळाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईतील वातावरण थंड झालंय. पालिकेच्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअस होतं. तर दिवसा 78% आणि रात्री 94% आर्द्रतेची पातळी नोंदवली गेली.
'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवार म्हणजे आज पासून पश्चिम वारे सक्रिय होतील. त्याचा परिणाम म्हणजे मुंबईत बऱ्यापैकी पाऊस पडेल. मात्र 17 आणि 18 जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर व उपनगरांत ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यतादेखील वर्तवण्यात आलीय. सोबतच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं येल अलर्ट जारी केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
हेही वाचा
- मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान कसं राहिलं, कुठे पाऊस पडण्याची शक्यता - Maharashtra news live updates
- ...तर गुजरातच्या जीएसटी आयुक्तांची महाबळेश्वरातील ६४० एकर जमीन होणार जप्त, आज निर्णय होणार - Mahabaleshwar land scam case
- पत्नी पत्नीच्या भांडणात पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी; निर्दयी बापानं पोटच्या मुलीला आपटलं जमिनीवर - Crime News