ETV Bharat / state

साताऱ्यासह रत्नागिरीला रेड अलर्ट; कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Heavy Rain In Mumbai And Satara - HEAVY RAIN IN MUMBAI AND SATARA

Heavy Rain In Mumbai And Satara  सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं कोयना नदीला पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडं रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला.

Heavy Rain In Mumbai And Satara
संपादित छायाचित्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 10:30 AM IST

नुंबई Heavy Rain In Mumbai And Satara मुंबईत आजदेखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईतील काही भागात २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सोबतच पुढील २४ तासात शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाच्या मुंबईतील कुलाबा प्रादेशिक केंद्रानं नमूद केलं आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १० वाजता पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील कुलाबा प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, विदर्भात देखील काही ठिकाणी तुरळक तर, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं वर्तवली आहे.

विदर्भालादेखील यलो अलर्ट जारी- हवामान विभागानं आज मुंबईसह धुळे, ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सोबतच कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं मुंबईसाठी २६ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी आहे. विदर्भात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि भंडारा, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, गोंदिया किंवा चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे विदर्भालादेखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शहरात मागील २४ तासात अनेक ठिकाणी २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस आणि उंच लाटांचा अंदाज असल्यानं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF च्या तीन तुकड्या शहरात तैनात करण्यात आल्या असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

  • सातारा जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट: सातारा जिल्ह्याला हवामान विभागानं आज आणि उद्या रेड अलर्ट दिला आहे. पश्चिम घाट क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. त्यामुळं कोयना नदीला पूर येण्याची शक्यता आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना नदीपात्रात १०५० क्युसेक्स पाणी सोडणार: कोयना धरणाचा पायथा वीजगृह मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १० वाजता कार्यान्वित केला जाणार आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक इतका विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळं कोयना नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा: कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्यानं कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तसेच हवामान विभागानं आणखी दोन दिवस सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. या पार्श्वभूमीवर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धरणात प्रतिसेकंद ६० हजार क्युसेक पाण्याची आवक: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात १०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कोयनानगर येथे ४२ मिलीमीटर, नवजा येथे २४ आणि महाबळेश्वरमध्ये ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद ६० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून धरणात २ टीएमसी पाणी वाढलं आहे. सध्या धरणात ६२ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. अद्याप पावसाळा शिल्लक असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली आहे.

हेही वाचा

  1. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा 'धुमधडाका'; चोवीस तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद - Heavy Rain In Satara
  2. सातारा जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'; कोयना धरणातील पाणीसाठा 'पन्नाशी' पार - Red Alert For Rain In Satara

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.