ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : मुंबईत सर्वात कमी, तर नक्षलग्रस्त गडचिरोलीत विक्रमी मतदान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील मतदान ? - ASSEMBLY ELECTION 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाला मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. मात्र मुंबईकरांनी सगळ्यात कमी मतदान केलं. तर नक्षलग्रस्त गडचिरोलीत विक्रमी मतदान झालं आहे.

Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2024, 7:27 AM IST

मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 चं मतदान बुधवारी पार पडलं आहे. राज्यात विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण 65.11 टक्के मतदान झालं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांधिक 76.25 टक्के एवढं मतदान झालं. तर मुंबई शहर 52.07 टक्के आणि मुंबई उपनगर 55.77 टक्के मतदानाची नोंद झाली. या दोन ठिकाणी राज्यातील सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. मतदानासाठी मुंबईकरांची उदासीनता पाहायला मिळाली. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात 73.68 टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे. पाहूया कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं, याची आकडेवारी.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी :

  • अहमदनगर - ७१.७३ टक्के
  • अकोला - ६४.९८ टक्के
  • अमरावती - ६५.५७ टक्के
  • औरंगाबाद- ६८.८९ टक्के
  • बीड - ६७.७९ टक्के
  • भंडारा - ६९.४२ टक्के
  • बुलढाणा - ७०.३२ टक्के
  • चंद्रपूर- ७१.२७ टक्के
  • धुळे - ६४.७० टक्के
  • गडचिरोली - ७३.६८ टक्के
  • गोंदिया - ६९.५३ टक्के
  • हिंगोली - ७१.१० टक्के
  • जळगाव - ६४.४२ टक्के
  • जालना - ७२.३० टक्के
  • कोल्हापूर - ७६.२५ टक्के
  • लातूर - ६६.९२ टक्के
  • मुंबई शहर- ५२.०७ टक्के
  • मुंबई उपनगर -५५.७७ टक्के
  • नागपूर - ६०.४९ टक्के
  • नांदेड - ६४.९२ टक्के
  • नंदुरबार- ६९.१५ टक्के
  • नाशिक - ६७.५७ टक्के
  • उस्मानाबाद - ६४.२७ टक्के
  • पालघर - ६५.९५ टक्के
  • परभणी - ७०.३८ टक्के
  • पुणे - ६१.०५ टक्के
  • रायगड - ६७.२३ टक्के
  • रत्नागिरी - ६४.५५ टक्के
  • सांगली - ७१.८९ टक्के
  • सातारा - ७१.७१ टक्के
  • सिंधुदुर्ग - ६८.४० टक्के
  • सोलापूर - ६७.३६ टक्के
  • ठाणे - ५६.०५ टक्के
  • वर्धा - ६८.३० टक्के
  • वाशिम - ६६.०१ टक्के
  • यवतमाळ - ६९.०२ टक्के

2019 साली किती टक्के मतदान? : गेल्यावेळी विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच फेरीत पार पडली. तेव्हा 288 जागांवर मतदान झालं. या निवडणुकीत एकूण 61.4 टक्के एवढं मतदान झालं. मागच्या वेळेच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत वाढ होताना दिसली. यावेळेस राज्यात विधानसभा निवडणुकीत बुधवारी सायंकाळी 6 वाजतापर्यंत 65.11 टक्के मतदान झालं. म्हणजे गेल्यावेळी पेक्षा पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाली. ही एक मतदारांमधील जागरूकता आहे.

मुंबईत कुठं झाले वाद ? : दुसरीकडं राज्यात नाशिक, परळी, बीड, केज या ठिकाणी अनुचित प्रकार घडले. तसे मुंबईत दोन ठिकाणी अनुचित प्रकार घडल्याचं समोर आलं. मुंबईतील मालाड पूर्व येथील पठाणवाडीत ठाकरे-शिंदे पक्षातील कार्यकर्ते एकमेकांत भिडले. ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीनं स्वतःच्या पक्षाला मत देण्यासाठी घेऊन जात होते, असा आरोप करण्यात आला. यावेळी हा प्रकार शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता, दोन गटात बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप करुन दोन्ही गटांना पांगवलं. तर दुसरीकडं सायन कोळीवाडा या बुथवर काँग्रेस कार्यकर्ते मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून देत असताना पोलीस आणि भाजपा नेते यांच्यात बाचाबाची झाली. दरेकर, लाड हे पोलिसांवर ओरडून बोलत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :

  1. वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; आजीनं स्ट्रेचरवरून बजावला मतदानाचा हक्क
  2. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; 'एक्झिट पोल'नुसार स्पष्ट बहुमत, MVA नं दिली 'टाईट फाईट'
  3. "Exit हे Exact नसतात", महाविकास आघाडीचा दावा; सत्ता आमचीच येणार, महायुतीला विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.