ETV Bharat / state

अजित पवार हे घरातच कुस्ती खेळणार; संजय राऊतांचा टोला - Sanjay Raut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 12:56 PM IST

Updated : Aug 16, 2024, 1:49 PM IST

Sanjay Raut : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या. निवडणुकीच्या दृष्टीनं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विविध योजनांचा पाऊस पाडला जातोय. अशातच आता खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला मारला.

Sanjay Raut
अजित पवार, रोहित पवार, संजय राऊत (File Photo)

मुंबई Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठल्या मतदारसंघातून लढवणार, याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या असताना यावर भाष्य करताना शिवसेना (उबाठा) नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं "बारामतीनंतर आता अजित पवार हे कर्जत - जामखेड या मतदारसंघातून त्यांचे पुतणे रोहित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवतील. सुंभ जळाला तरी पीळ मात्र कायम आहे," असा टोला त्यांनी लगावला. ते मुंबईत बोलत होते.

घरातल्या घरातच कुस्ती करणार : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण बऱ्यापैकी तापलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, याविषयी अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. अशातच खासदार संजय राऊतांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, "बारामतीमधून अजित पवार लढणार नाहीत. कारण बारामतीमध्ये लोकसभेत जनतेनं त्यांचा संपूर्ण रस पिळून काढलेला आहे. आता ते पुतण्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे. कर्जत- जामखेडमधून ते पुतणे आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध लढतील. कारण ते घरातच लढणार. शेवटी सुंभ जळाला तरी पीळ कायम, अशी त्यांची अवस्था आहे. पण ते घरातल्या घरातच कुस्ती करणार. तसंच जे पक्ष सोडून निघून गेले आहेत त्यांना आम्ही निवडणुकीत हरवणारच. मी शरद पवार यांच्याकडून सुद्धा ऐकलं आहे की, अजित पवार सोडून इतरांना ते परत पक्षात घेऊ शकतात."

दरोडेखोरांचं सरकार हटवायचंय : "जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं आहे. उद्धव ठाकरे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी तिथं सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी या सर्वांची भेट घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा केली. कारण महाराष्ट्रात असलेलं दरोडेखोरांचं सरकार हे आम्हाला हटवायचं आहे. यासाठी आज आम्ही रणशिंग फुंकलं आहे," असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीतील नेत्यांचा दरोडेखोर असा उल्लेख केला.

जनतेच्या कराच्या पैशातून हप्तेबाजी : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'वरुन संजय राऊतांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. "तुम्ही ठेकेदारांकडून हप्ते घेता आणि सरकारच्या तिजोरीतील पैशातून मत विकत घेता. आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी ५०-५०, १००-१०० कोटी कुठून आणलेत? साताऱ्यातील शेतीच्या पैशातून हे केलं गेलं आहे का? महायुतीचं सरकार हे फक्त दोन महिन्यासाठी आहे. यांचं संपूर्ण आयुष्य हप्तेबाजीवर पोसलं गेलं. इथून हफ्त्यांच्या थैल्या जमा करायच्या आणि त्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपलं मुख्यमंत्रिपद टिकून ठेवायचं, अशा व्यक्तीबद्दल महाराष्ट्राने काय बोलायचं? हा लाडक्या बहिणींचा प्रचार नसून हा निवडणुकीचा प्रचार आहे, त्यालाच 'हप्तेबाजी' म्हणतात. जनतेच्या कराच्या पैशातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हप्तेबाजी होत आहे हे इतिहासात प्रथमच होत आहे," असा टोला लगावत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा

  1. पंतप्रधान मोदींचं भाषण सुरु असताना तिकडं जवानांच्या रक्ताचे सडे पडतात; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Pm Modi
  2. देवेंद्र फडणवीसांकडं अधिकार म्हणजे 'मविआ'साठी शुभसंकेत, संजय राऊतांची खोचक टीका - Sanjay Raut News
  3. लोकशाहीच्या मार्गानं महायुती सरकार घालवणार - संजय राऊत - Sanjay Raut On MVA

Last Updated : Aug 16, 2024, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.