ETV Bharat / state

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घराचा काही भाग कोसळला - Maharashtra Live updates

Maharashtra Live updates
Maharashtra Live updates (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 7:12 AM IST

Updated : Jun 14, 2024, 10:31 PM IST

Maharashtra Breaking News : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी या पेजवर अपडेट पाहत राहा. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या /mr/maharashtra

LIVE FEED

10:30 PM, 14 Jun 2024 (IST)

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घराचा काही भाग कोसळला

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात असलेल्या विजय नगरमध्ये घराचा काही भाग कोसळला. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेत काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलानं दिली.

9:14 PM, 14 Jun 2024 (IST)

कोयना धरणातील पाण्यानं गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद

सातारा - सातारा जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे लवकरच मान्सून देखील सक्रिय होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडला आहे. बोटींग सेवा बंद पडल्याने धरणांतर्ग गावातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

8:02 PM, 14 Jun 2024 (IST)

राम मंदिर बॉम्बने उडवणार; 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेकडून धमकी

राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अयोध्येत सुरक्षा वाढवली आहे.

6:58 PM, 14 Jun 2024 (IST)

शीना बोरा हत्याकांडातील महत्त्वपूर्ण हाडे मिळत नसल्याची सीबीआयची न्यायालयाला माहिती

हायप्रोफाईल व बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख पुरावा असलेली शीनाच्या मृतदेहाची जळालेली हाडे सापडत नसल्याची माहिती सीबीआयने सत्र न्यायालातील सुनावणी दरम्यान दिली. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत तीन वेळा सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. हा पुरावा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने तो मिळाला नाही तर त्याचा या खटल्याच्या सुनावणीवर मोठा प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

5:21 PM, 14 Jun 2024 (IST)

मुंबईतील धारावी परिसरात आढळला अर्भकाचा मृतदेह

मुंबईतील धारावी परिसरात एका अर्भकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असून परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

5:01 PM, 14 Jun 2024 (IST)

पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी

पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. त्यांची पोलीस कोठडी आज संपली असून, त्यानंतर त्यांना न्यायालयात पुन्हा हजर केलं होतं.

5:01 PM, 14 Jun 2024 (IST)

अजित पवार गटाकडून संसदीय कामकाज सल्लागार समितीला एकही प्रतिनिधी उपस्थित नाही

विजय वडेंटीवार ऑनलाइन उपस्थित, अजित पवार ऑनलाईन उपस्थित नाही

नरहरी झिरवाळ हे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून हजर

4:46 PM, 14 Jun 2024 (IST)

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जून रोजी होणार सुरू

कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलै पर्यंत

अर्थसंकल्प मांडल्यानंतर एक दिवस कामकाज वाढवलं

शनिवारीसुद्धा होणार कामकाज

अर्थसंकल्पावरील अभिभाषणावर चर्चा होणार शनिवारी

राज्याचा अंतिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडणार

3:48 PM, 14 Jun 2024 (IST)

रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट

अजित पवारांमुळं भाजपानं स्वतःची ब्रॅण्ड_व्हॅल्यू संपवल्याची आधी ऑर्गनायझरमधून झालेली टीका नंतर दहा वर्षे शांत झोपलेल्या कथित गांधींनी अचानक जागे होऊन शिखर बँक प्रकरणी अजित पवारांच्या क्लिन चिट विरोधात न्यायालयात जाण्याची घेतलेली भूमिका आणि काल राज्यसभेचा अर्ज भरताना एकाही भाजपेयीची नसलेली उपस्थिती हा घटनाक्रम लक्षात घ्या..

#Use_and_Throw ही भाजपाची प्रवृत्ती असून त्यानुसारच ते आज अजितदादांसोबत वागत आहेत, हा क्लिअर मेसेज आहे.

‘भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो’ हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय.

1:52 PM, 14 Jun 2024 (IST)

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात पोलिसांनी तपास करावा-न्यायालयाचे आदेश

सोने व्यापारी पृथ्वीराज कोठारी यांची 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात बीकेसी पोलिसांनी तपास करावा, असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी दिले आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या सतयुग गोल्ड प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार कोठारी यांनी करत न्यायालयासमोर दाद मागितली.

12:28 PM, 14 Jun 2024 (IST)

लखनौमध्ये अतिक्रमण बांधकामाविरोधात मोठी कारवाई, जवळपास 500 घरे जमीनदोस्त

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अकबर नगरमधील बांधकाम पाडण्यात येत आहे. लखनौ महानगरपालिकेचे आयुक्त इंद्रजित सिंग म्हणाले, "वैद्यकीय पथक इथे आहे. कूलिंग सेंटर्स बसवण्यात आली आहेत. उष्माघातावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ओआरएस सोल्युशन आणि पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे." अकबर नगरमधील जवळपास 500 घरे पाडण्यात आली आहेत. 600 घरे अजूनही उरली आहेत. ती पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2-3 दिवसांत पाडण्याची मोहीम पूर्ण होईल, असे एलडीएचे कुलगुरू डॉ इंद्रमणी त्रिपाठी यांनी सांगितलं.

11:02 AM, 14 Jun 2024 (IST)

आरएसएस सत्तेत बसलेल्यांना लवकरच दूर करेल-संजय राऊत

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, "लोक हे लोकशाहीत देव आहेत. अशा ३० हून अधिक जागा आहेत, जिथे भाजपचा पराभव झाला आहे. मात्र तिथे धमकावून भाजपानं बहुमत मिळविलं आहे. भाजपाचा पूर्णपणे पराभव झाला आहे. देव सर्व पाहत आहे. जिथे भगवान श्रीराम वास करत होते तिथे ( अयोध्या) भाजपाचा पराभव झाला. शिंदे, अजितदादा गट गुजरातमधील ईस्ट इंडिया कंपनीचे गुलाम झाले आहे. आरएसएस सत्तेत बसलेल्यांना लवकरच दूर करेल. अण्णा हजारे यांनी राज्यातील घोटाळे आणि इलेक्टोरल बाँडवर प्रश्न उपस्थित करावेत. "

10:01 AM, 14 Jun 2024 (IST)

45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचे विशेष विमान आज कुवेतमधून भारतात पोहोचणार

कुवेतमध्ये 12 जून रोजी लागलेल्या भीषण आगीत प्राण गमावलेल्या ४५ भारतीयांचे पार्थिव घेऊन हवाई दलाचे विशेष विमान आज सकाळी भारतात पोहोचेल. हे विमान प्रथम कोची, केरळ येथे पोहोचेल. त्यानंतर दिल्लीला येईल. कुवेतच्या दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री कीर्तीवर्धन सिंह हेही त्याच विमानाने परतणार आहेत. कुवेतच्या मंगाफ शहरातील एका सहा मजली इमारतीला बुधवारी भीषण आग लागली. यात ४९ भारतीयांचा मृत्यू झाला. त्या इमारतीत 176 भारतीय कर्मचारी होते. मृतांमध्ये केरळमधील 23 जणांचा समावेश आहे. यात तामिळनाडूमधील आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी तीन, ओडिशातील दोन आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि हरियाणातील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे.

9:47 AM, 14 Jun 2024 (IST)

"उत्तर प्रदेशसारख्या राज्यात भाजपला कमी जागा मिळाल्या..." छगन भुजबळ यांचं आरएसएसच्या टीकेला उत्तर

मुंबई: मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज पुण्यातील भिडे वाड्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला (राष्ट्रवादी काँग्रेस) 48 जागांपैकी फक्त 4 जागा देण्यात आल्या होत्या. त्या 4 पैकी 2 जागा आमच्याकडून काढून घेण्यात आल्या. त्यामुळे या 2 जागांपैकी रायगडमध्ये आम्ही 1 जागा जिंकली आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. त्याबाबत कुणीही काहीही म्हटलं नाही. अजित पवार गटाला दोष देणे योग्य नाही." दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाला अजित पवार गटाला जबाबदार धरले होते. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रत्युत्तर देत आहेत.

9:38 AM, 14 Jun 2024 (IST)

मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार -उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत हे जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं उद्योगमंत्री सामंत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून सांगितलं. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होईल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.

9:31 AM, 14 Jun 2024 (IST)

पाकिस्तानला टी20 मध्ये पराभूत केल्यावर अमेरिकन सरकारला काय वाटते?

न्यूयॉर्क- T20 क्रिकेट विश्वचषकात प्रथमच सहभागी झालेल्या अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत केले. याबाबत विचारले असता, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " जेव्हा मी माझे कौशल्य नसलेल्या गोष्टींवर भाष्य करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला अनेकदा अडचणी येतात. मी एवढेच म्हणेन, त्यामध्ये पाकिस्तानचा क्रिकेट संघदेखील आहे."

8:54 AM, 14 Jun 2024 (IST)

मुंबईच्या काही भागात पावसानं लावली जोरदार हजेरी

मुंबईच्या काही भागांत पावसाचा जोर वाढला. ईस्टर्न एक्सप्रेसवे आणि वडाळा भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.

8:53 AM, 14 Jun 2024 (IST)

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी तिरुपती बालाजीचे घेतले दर्शन

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, भाजपा खासदार सीएम रमेश आणि टीडीपी आमदार रघु रामा कृष्णम राजू यांनी तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.

8:14 AM, 14 Jun 2024 (IST)

सुशांतसिंहची आज पुण्यतिथी, बहिण श्वेता सिंहनं काय केली पोस्ट?

अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूचं अद्याप कोडे उलगडलेले नाही. त्याची बहिण श्वेता सिंहं एक्स मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं पोस्टमध्ये म्हटले, "भाऊ, तू आम्हाला सोडून ४ वर्षे झाली आहेत. १४ जून २०२० ला काय झाले ते आम्हाला अजूनही कळले नाही. तुझा मृत्यू एक गूढच आहे. मी सत्य जाणण्यासाठी विनंती केली आहे, पण आज, शेवटच्या वेळी, मी मदत करू शकणाऱ्या प्रत्येकाला विचारतेय. आमचा भाऊ सुशांतचे काय झाले, हे जाणून घेण्यास आम्ही पात्र नाही का?"

7:30 AM, 14 Jun 2024 (IST)

भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्माणाधीन कोस्टल महामार्गाची केली पाहणी

मुंबई: भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्माणाधीन कोस्टल महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " मी सी लिंकला जोडणारा कोस्टल हायवे पाहून खूप समाधानी आहे. आम्ही सी लिंकला जोडणारा भाग जुलैपर्यंत पूर्ण करणा आहेत. त्यानंतर रस्त्यावरील वाहतुक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल."

7:21 AM, 14 Jun 2024 (IST)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस, नितीन गडकरींनी सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त एक्स मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईकरांसाठी मनसेकडून ‘राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबई मनसेचे आरोग्यदूत वैद्यकीय सेवेसाठी कायम तत्पर असणार असल्याचं मनसेकडून एक्स मीडियावर पोस्ट केलं.

Last Updated : Jun 14, 2024, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.