ETV Bharat / state

आचारसंहितेपूर्वीच महायुतीची बाजी, राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची वर्णी, पाहा संपूर्ण यादी - CHITRA KISHORE WAGH

राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात पार पडलाय. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना शपथ दिलीय.

member of legislative council
राज्यपाल नियुक्त आमदार (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2024, 1:29 PM IST

Updated : Oct 15, 2024, 1:51 PM IST

मुंबई- निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करणार आहे. तत्पूर्वीच राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात पार पडलाय. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना शपथ दिलीय. राज्य विधान परिषदेत राज्यपालांच्या कोट्यातील 12 आमदारांची पदे चार वर्षांहून अधिक काळापासून रिक्त होती. 6 नोव्हेंबर 2020 ला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना 12 उमेदवारांची यादी पाठवली होती, परंतु आजपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. तत्कालीन राज्यपाल कोश्यारीही निवृत्त झाले आणि त्यांच्यानंतर राज्याचे राज्यपाल झालेले रमेश बैस यांनीही यावर कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 12 आमदारांच्या रिक्त पदांबाबत उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे.

नियुक्त्यांसाठी 7 जणांच्या नावांची शिफारस : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूरचे प्रमुख सुनील मोदी यांच्या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. मोदींनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधी प्रकरणात तातडीने निर्णय देण्याच्या उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती, परंतु उच्च न्यायालयानं त्यास नकार दिलाय. त्यामुळे आता होणाऱ्या शपथविधी समारंभासमोरील विघ्न टळलंय. आता सरकारने या नियुक्त्यांसाठी 7 जणांच्या नावांची शिफारस केल्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडलाय. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधान परिषदेवर सात आमदारांची नियुक्ती केलीय. यामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा किशोर वाघ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पोहरा देवी येथील धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नायकवडी, माजी खासदार हेमंत श्रीराम पाटील, डॉ. मनीषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभेच्या अनेक जागा दीर्घकाळापासून रिक्त होत्या.

विधान भवनात आमदारकीची शपथ : महायुतीकडून 7 सदस्यांची शिफारस राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आली होती. या 7 सदस्यांमध्ये भाजपाचे 3, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 अशा एकूण 7 जणांचा समावेश होता. या 7 नावांच्या शिफारशींना राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर या सदस्यांनी आज विधान भवनात आमदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असते. परंतु आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास अगोदर राजकीय क्षेत्रातील नेत्यांची या जागेवर वर्णी लावल्या कारणाने विरोधकांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा: महायुतीनुसार भाजपाला तीन तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्यात. चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंह महाराज राठोड यांना भाजपाकडून आमदारकी मिळालीय, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नायकवडी यांना संधी मिळालीय. डॉ. मनिषा कायंदे आणि हेमंत श्रीराम पाटील हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आहेत.

अपक्षांसह आता महायुतीचे संख्याबळ 41 : राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची वर्णी लागल्यावर विधान परिषदेमध्ये महायुतीचं संख्याबळ आता वाढलंय. यामध्ये राज्यपाल नियुक्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवायच्या जागांचा समावेश आहे. महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांसह आता महायुतीचे संख्याबळ 41 झालंय. तर महाविकास आघाडीचे संख्याबळ 17 आहे. आता 7 सदस्यांच्या नियुक्तीनंतरसुद्धा 20 जागा रिक्त असणार आहेत.

हेही वाचा-

  1. प्रलंबित राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
  2. अजित पवारांच्या दौऱ्याची काँग्रेसच्या आमदाराकडून जय्यत तयारी; काँग्रेसनं केलं निलंबित

Last Updated : Oct 15, 2024, 1:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.