मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्यात. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे. मतदारांच्या तक्रारींनंतर योग्य पद्धतीनं मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने मुंबईतील मतदान केंद्र आणि सुविधांमध्ये सुधारणा केल्यात. महाराष्ट्रात 36 जिल्हे असून, सर्व 288 विधानसभांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सध्या 9.63 कोटींच्या जवळपास मतदार असून, त्यापैकी 1.85 युवा मतदार आहेत. यावेळी राज्यात 1,18,600 मतदान केंद्रे असणार आहेत. विशेष म्हणजे मतदानासाठी पीडब्ल्यूडी आणि महिला बूथही बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. या महायुतीत शिवसेनेबरोबरच भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. दुसऱ्या बाजूला विरोधात महा विकास आघाडी आहे. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. आज आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर विधानसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी चेंबूर हासुद्धा एक मतदारसंघ आहे.
चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे समीकरण: चेंबूर विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. तसेच तो मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एक म्हणून गणला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश फातर्पेकर यांना चेंबूर विधानसभा मतदारसंघातून 53 हजार 264 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंना यांना 34 हजार 246 मतं मिळाली होती. तसेच चेंबूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यांचे उमेदवार राजेंद्र माहुलकर यांना तब्बल 23,178 मतं मिळाली होती. खरं तर चेंबूरमध्ये मनसेनं चौथ्या पसंतीची मतं मिळवली होती. मनसेचे उमेदवार कर्ण डुंबाळे यांना 14,404 मतं मिळाली होती. चेंबूरमध्ये कोकणी मतदार मोठ्या प्रमाणात असला तरी दलित आणि उत्तर भारतीय मतंही निर्णायक ठरतात.
चेंबूर मतदारसंघात 1962 पासून निवडणूक: चेंबूर मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मुकाबला होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून तुकारात काते यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश फातर्पेकर यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे चेंबूरमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चेंबूर मतदारसंघात 1962 पासून निवडणूक होत असून, इथे आजमितीस अनेक पक्षांचे नेते निवडून आलेत. 1978 मध्ये जनता पार्टीच्या उमेदवारानं चेंबूरमधून विजय मिळवला होता. त्यानंतर 1999 चा अपवाद वगळता जवळपास काँग्रेसनं पाच वेळा या जागेवरून विजय मिळवलाय. परंतु सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर इथून आमदार असून, शिंदे गटानं तुकाराम काते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे इकडे अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. वैकुंठ वासुदेव फातर्पेकर हे शिवसेना पक्षाचे नेते असून, 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते दहावी पास आहेत.
चेंबूर विधानसभेत मुस्लिम मतदार किती?: आकडेवारी पाहिल्यास चेंबूर विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 21,390 च्या जवळपास आहे, जी मतदार यादीच्या विश्लेषणानुसार सुमारे 8.4 टक्के असल्याचे सिद्ध होते. जर आपण शहरी मतदारांची संख्या पाहिली तर ती अंदाजे 2,54,648 आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, चेंबूर विधानसभेत एकूण 2,54,648 मतदार आहेत. येथील मतदान केंद्रांची संख्या 285 आहे. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चेंबूर विधानसभेत एकूण 52.09 टक्के मतदान झालं होतं.
2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल | ||
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
प्रकाश फातर्पेकर | शिवसेना | 53,264 |
चंद्रकांत हंडोरे | काँग्रेस | 34,246 |
राजेंद्र माहुलकर | वंचित बहुजन आघाडी | 23,178 |
2014 विधानसभा निवडणुकीचा निकाल | ||
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
प्रकाश फातर्पेकर | शिवसेना | 47,410 |
चंद्रकांत हंडोरे | काँग्रेस | 37,383 |
दीपक निकाळजे | आरपीआय | 36,615 |
2009 विधानसभा निवडणुकीचा निकाल | ||
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
चंद्रकांत हंडोरे | काँग्रेस | 47,431 |
अनिल चव्हाण | मनसे | 29,465 |
अनिल ठाकूर | भाजपा | 21,751 |
हेही वाचा