ETV Bharat / state

नाम साधर्म्याचा फटका निवडणुकीत राजकीय नेत्यांना बसणार; नावात काय आहे? नव्हे नावातच सर्व काही... - VAIBHAV NAIK

राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवाराशी नाम साधर्म्य असलेले दुसरे उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारी घेऊन आलेल्या उमेदवारांना या अपक्ष उमेदवारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra election 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2024, 6:58 PM IST

मुंबई : नावात काय आहे, असे विल्यम शेक्सपियरने म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात नावातच सर्व काही आहे, याचा अनुभव अनेकांना येत असतो. सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक उमेदवारांना नावात काय आहे, याचा चांगलाच अनुभव आलाय. कुडाळ-मालवण मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दुसरे वैभव नाईक रिंगणात उतरलेत. या मतदारसंघात भाजपातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार निलेश राणे यांच्याशी वैभव नाईक यांचा सामना होतोय. त्यामुळे या अटीतटीच्या निवडणुकीत वैभव नाईक नावाचा उमेदवार किती मते घेतो आणि त्याचा विद्यमान आमदार वैभव नाईकांना किती फटका बसतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

कांदे यांचे वांदे करण्यासाठी दुसरे सुहास कांदे रिंगणात : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधातदेखील सुहास कांदे नावाचा दुसरा उमेदवार रिंगणात उतरलाय. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलीय, त्यामुळे या मतदारसंघातदेखील अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुहास कांदे यांचे वांदे करण्यासाठी दुसऱ्या सुहास कांदेंना रिंगणात उतरवण्यात आल्याची चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदारसंघातील शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेल्या संजय कदम यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या आणखी दोन संजय कदम या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत. त्यामुळे दापोली मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश कदम आणि संजय कदम यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या योगेश कदम आणि संजय कदम यांनी अर्ज दाखल केल्याने त्याचा कितपत फटका खऱ्या अधिकृत उमेदवारांना बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या गणेश गीते यांनी अर्ज दाखल केलाय. त्याशिवाय नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या विरोधात दुसरे वसंत गीते रिंगणात उतरलेत.

महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे.

रायगडमध्येही दुसरे गीते रिंगणात: 2024 मधील लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केला होता, उल्लेखनीय बाब म्हणजे या दुसऱ्या भास्कर भगरेंना सुमारे लाखभर मते मिळाली होती. त्यामुळे याची राज्यभरात चर्चा झाली होती. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दुसरे अनंत गीते रिंगणात उतरले होते.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.