ETV Bharat / state

समाजवादी पक्षाकडे महाविकास आघाडीचं दुर्लक्ष; स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात?

लोकसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावल्यामुळे त्यांनी समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षाकडे जागावाटपात दुर्लक्ष केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

maharashtra election 2024
समाजवादी पक्षाकडे महाविकास आघाडीचं दुर्लक्ष (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2024, 6:25 PM IST

मुंबई- समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत आहे की नाही याबाबत अद्याप संदिग्धता कायम आहे. समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे पाच जागांची मागणी केली होती. मात्र शेवटपर्यंत महाविकास आघाडीने त्यांना पाच जागा सोडण्यास नकार दिलाय. त्यामुळे समाजवादी पक्षाने राज्यात नऊ जागांवर त्यांचे उमेदवार उभे केलेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षांच्या चार उमेदवारांची घोषणा केलीय.

मविआचे छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत समाजवादी पक्षाने इंडिया आघाडीला मनापासून पाठिंबा दिला होता. राज्यात एकही जागा न लढवता समाजवादी पक्षाने काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा प्रचार केला होता. राज्यातील मुस्लिमबहुल भागामध्ये त्याचा इंडिया आघाडीला चांगला लाभ झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून चांगली वागणूक मिळेल, अशी अपेक्षा समाजवादी पक्षाला होती. परंतु महाविकास आघाडीने त्यांचा अपेक्षाभंग केलाय. विधानसभा निवडणुकीत अद्याप समाजवादी पक्षासोबत आघाडी झालेली नसल्याने समाजवादी पक्षाच्या नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची भीती आहे. लोकसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावल्यामुळे त्यांनी समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षाकडे जागावाटपात दुर्लक्ष केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

समाजवादीमध्ये नाराजीचे वातावरण: 2019 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षातर्फे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख या दोघांनी विजय मिळवत विधिमंडळात प्रवेश केला होता. राज्याच्या अल्पसंख्याकबहुल काही भागात अबू आझमी यांचा प्रभाव आहे. अबू आझमींचे नऊ उमेदवार रिंगणात राहिले तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीकडून समाजवादीला पुरेसा सन्मान आणि जागा वाटपात योग्य संधी मिळाली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

आझमींना मानणारा मुस्लिम समाजात मोठा वर्ग : अबू आसीम आझमी यांना अल्पसंख्याक मुस्लिम समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. अल्पसंख्याकांचे विविध प्रश्न सातत्याने आझमी विधानसभेत मांडत असतात. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ते नेहमी आवाज उठवतात. इतर पक्षातील मुस्लिम नेत्यांच्या तुलनेत अबू आझमी हे अधिक आक्रमकपणे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडतात. त्यामुळे त्यांची मुस्लिम समाजात एक वेगळी प्रतिमा आहे. आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी अर्ज भरल्याने मुस्लिम समाजाची मते विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

समाजवादी पक्षाकडून कुणाला कुठल्या मतदारसंघातून उमेदवारी? : समाजवादी पक्षाने राज्यातील 9 मतदारसंघांत आपले उमेदवार दिलेत. त्यामध्ये आमदार अबू आसीम आझमी यांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अर्ज भरलाय. त्यांच्यासमोर शिवसेना उबाठा पक्षामधून राजेंद्र वाघमारे यांनी अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरलाय. आमदार रईस शेख यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून अर्ज भरला आहे. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते निहाल अहमद यांची कन्या शान-ए-हिन्द निहाल अहमद - मालेगाव मध्य मतदारसंघातून रिंगणात आहेत. इरशाद जागीरदार यांनी धुळे शहर मतदारसंघातून अर्ज भरलाय, त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंतर्फे अनिल गोटे हे रिंगणात आहेत. भिवंडी पश्चिममधून समाजवादी पक्षाने रियाज आझमी यांना, तुळजापूर मतदारसंघातून देवानंद रोचकारी, परांडा मतदारसंघातून अॅड रेवण भोसले, औरंगाबाद पूर्वमधून डॉ. अब्दुल गफार कादरी सय्यद आणि भायखळा मतदारसंघातून सईद खान यांना उमेदवारी दिलीय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज होती. आमच्याशी संवाद साधण्याची गरज होती, मात्र त्यांनी आम्हाला पूर्णपणे डावललंय. जागा वाटपाच्या चर्चेत त्यांनी आम्हाला सहभागी करून घेतलं नाही. त्यांना केवळ आमची मदत हवी आहे, मात्र आम्हाला सन्मान देणं, जागा सोडणे त्यांना अडचणीचे वाटत असावे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत की नाहीत हे स्पष्ट होणार आहे. समाजवादी पक्षातर्फे आम्ही केवळ जिंकण्याची शक्यता आहे, अशाच ठिकाणी समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवलेत. महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करून आम्हाला योग्य सहकार्य केले असते तर महाविकास आघाडीला आणि आम्हाला अधिक सशक्तपणे लढता येणे शक्य झाले असते. आपल्यासमोर नवाब मलिक यांनी अर्ज भरला असला तरी त्यांना धर्मनिरपेक्ष मते मिळणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. अल्पसंख्याकांची मते आणि धर्मनिरपेक्ष मते नवाब मलिक यांना मिळणार नाहीत, मलिक उभे राहिल्याने काही प्रमाणात नुकसान होईल, मात्र मलिकांचा पक्ष महायुतीत भाजपासोबत असल्याने त्याची जाणीव अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष मतदारांना असून, ते योग्य ते निर्णय घेतील.

- अबू आसीम आझमी, प्रदेशाध्यक्ष, समाजवादी पक्ष

हेही वाचा

  1. अमित ठाकरेंचा दारोदारी जाऊन प्रचार सुरू, पण सदा सरवणकरही निवडणूक लढवण्यावर ठाम
  2. जरांगे पाटील 'येडा' माणूस; ओबीसी 'या' उमेदवारांना मतदान करणार नाही, लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.