दौसा(राजस्थान) CM Eknath Shinde visited Mehndipur Balaji : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबासह राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील सिद्धपीठ मेहंदीपूर बालाजी धाम येथे पोहोचले. येथे त्यांनी बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं. तिथं त्यांनी विशेष पूजा केली. तसंच बालाजी महाराजांना सुका मेव्यासह मिठाईचा प्रसाद अर्पण केला. यावेळी सिद्धपीठ बालाजी धामचे पीठाधीश्वर महंत डॉ. नरेशपुरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धामबाबत सविस्तर माहिती दिली.
ट्रस्टच्या लोककल्याणकारी योजनांची घेतली माहिती : महंत नरेशपुरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालाजी मंदिर ट्रस्टतर्फे राबविल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रस्टनं चालवल्या जाणाऱ्या मुलींचं मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा तसंच भाविकांसाठी मोफत लंगर व्यवस्थेचं कौतुक केलं. यानंतर त्यांनी राम मंदिरात जावून दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मेहंदीपूर बालाजीला आले होते. त्यामुळं लोकसभा निवडणुकीपूर्वीचा त्यांचा राजस्थान दौरा चर्चेत आहे. पाच डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीनं मेहंदीपूर बालाजीला पोहोचून बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात मेहंदीपूर बालाजीमध्ये दौसा तसंच गंगापूर जिल्हा प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शहरात ठिकठिकाणी भाविकांना रोखण्यात आलं होतं. यावेळी दौसाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश अग्रवाल, मानपूरचे पोलीस उपअधीक्षक दीपक मीणा, मुरारी लाल मीणा, बैजूपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेंद्र सिंह, बालाजी पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव प्रधान, सुरेश कुमार यांच्यासह मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
हे वाचलंत का :
- उबाठा गटाची बुधवारी 15 उमेदवारांची यादी जाहीर होणार, ठाकरे गट किती जागा लढवणार? - Lok Sabha Elections
- रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर; पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा - NCP candidate list
- "कोल्हापूर, साताऱ्याची जागा निसटली मग कसला 45 प्लस...", जयंत पाटलांनी उडवली भाजपाची खिल्ली - Jayant Patil On Mahayuti