ETV Bharat / state

मुंबईकरांना सरकारचा मोठा दिलासा, राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत घेतले 'हे' 20 मोठे निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार

Cabinet Decision Today : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कॅबिनेटनं 20 मोठे निर्णय घेतले आहेत. यात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. तसंच नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्याचा निर्णय झालाय.

Cabinet Decision Today
Cabinet Decision Today
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 4:19 PM IST

Updated : Feb 5, 2024, 7:58 PM IST

मुंबई Cabinet Decision Today : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांमध्ये मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईतील मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्याशिवाय सरकार दोन लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध करणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुंबईकरांना दिलासा : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीय. यामुळं मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांवरील सुमारे 736 कोटी रुपयांचा कराचा वाढीव आर्थिक भार टळणार आहे. यासंदर्भात भांडवली मुल्याधारीत करप्रणालीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची अंमलबजावणी करुन अंतिम देयकं मिळावीत याकरीता करदात्यांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्या प्राप्त झालेल्या होत्या. कर निर्धारण व त्यानुषंगानं मालमत्ता कराबाबतची सुधारित देयके कायद्यात सुधारणा केल्यानंतर द्यावी लागणार आहेत. त्यानुषंगानं मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 या कायद्यात प्रलंबित असलेली सुधारणा विचारात घेता, 2023-24 मध्ये भांडवली मुल्य सुधारीत न करता मुंबईतील करदात्यांना सवलत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नमो महारोजगार मेळाव्यांमधून 2 लाख रोजगार : छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. यापुर्वी नागपूर इथं प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसुली विभागात एक, याप्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे देखील आयोजित करण्याचं ठरलंय. या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली असून उद्योजकांसह विविध घटकांना सहभागी करुन घेण्यात येत आहे.

शिर्डी विमानतळाचा विस्तार : आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांना बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आलीय. यामध्ये टर्मिनल उभारणी, अँप्रानचं विस्तारीकरण व इतर कामांसाठी 876 कोटी 25 लाख व उर्वरित कामांसाठी 490 कोटी 74 लाख अशा खर्चास कार्योत्तर मान्यता देण्यात आलीय. यात भुसंपादन, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, सर्वेक्षण व माती परिक्षण, धावपट्टीचं विस्तारीकरण आदी तांत्रिक कामांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

  • मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही.
  • राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार
  • राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार
  • उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार
  • मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी
  • पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी
  • बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार
  • शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी
  • धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार
  • सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
  • स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता
  • बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार
  • कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता
  • तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार
  • नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार
  • कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय
  • गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : अजित पवार अर्थमंत्री होणार असल्याच्या चर्चेने शिंदे गटात अस्वस्थता, म्हणूनच होतोय मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर?
  2. Maharashtra Politics: फडणवीस यांचे पुन्हा एकदा रात्रीस खेळ चाले...एकनाथ शिंदेंची उशिरा भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण
  3. NCP Politics Crisis: छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाने भाजप आमदारांचे मंत्रीपद हुकणार? राजकीय विश्लेषक म्हणतात...

Last Updated : Feb 5, 2024, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.