ETV Bharat / state

हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस - Maharashtra Budget 2024 - MAHARASHTRA BUDGET 2024

Maharashtra Budget 2024 : विधानसाभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला आहे. हा अर्थसंकल्प प्रगतिशील, 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' असून सर्व समाजघटकांना दिलास देणारा आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. वाचा सविस्तर

Maharashtra Budget 2024
पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 12:40 PM IST

नागपूर Maharashtra Budget 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रगतिशील, 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' असा असून सर्व समाजघटकांना दिलासा देणारा आहे. निवडणुकीचा नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची स्तुतीसुमनं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उधळली. ते शुक्रवारी नागपूर येथील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

महिला केंद्रीत अर्थसंकल्प: "महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाचा विचार पुढं नेणारा आहे. मी अजित पवार यांचं अभिनंदन करतो. महिला, युवा आणि शेतकऱ्यांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. सातत्यपूर्ण विकासाचा यात निर्धार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येणार असून यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा: मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेच्या माध्यमातून ४५ लाख शेतकऱ्यांना वीजमाफी दिली जाणार आहे. यासाठी ७ हजार ७७७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. सौर ऊर्जा योजनेच्या अंमलबजावणीचा विचार सुद्धा केला आहे. १८ महिन्यात ही योजना पूर्ण करायची आहे. त्यामुळे ३० टक्के अनुदान मिळणार आहे. सर्व कृषिफिडर सौर उर्जेवर आणणार आहोत. यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज देता येणार आहे. ९.५ लाख सौरऊर्जा पंप मंजूर केले आहेत. जो अर्ज करेल, त्याला कर्ज मंजूर केलं जाणार आहे. यामुळे ९० टक्के शेतकरी हे मोफत विजेचे लाभार्थी होणार आहेत. उपसा सिंचन योजनेचे सौर उर्जिकरण करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि १ रुपयात पीकविमा यासारख्या योजना सुरूच राहणार आहेत. दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

थापांचा नाही, तर माय-बापांचा अर्थसंकल्प: "मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. या हवेतील घोषणा नाहीत, तर विचारपूर्वक घेतलेले निर्णय आहेत. हा थापांचा नाही, तर माय-बापांचा अर्थसंकल्प आहे. कोरोना, दुष्काळी वर्षात दरडोई उत्पन्नात कमी-अधिक होणं स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही प्रगत राज्याच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. आर्थिक बेशिस्तीकडं राज्य जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे," असंही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा

  1. अर्थसंकल्पात मोफत घोषणांचा पाऊस, पण वस्तुस्थिती काय? - Atul Londhe On Budget 2024
  2. बहिणीला दिला ४ महिने त्रास, आता आणली लाडकी बहीण योजना : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाना - Ladaki Bahin Yojana
  3. थापा आणि निवडणूक जुमल्यांचा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची सरकारवर सडकून टीका - Opposition on Maharashtra Budget
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.