२ जुलै रोजी विधान परिषद सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. परंतु आज संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच दिवसाच्या निलंबनाऐवजी ३ दिवसाच्या निलंबनाचा ठराव सभागृहात मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर हे निलंबन ३ दिवसाचे करण्यात आले आहे.
याचा अर्थ अंबादास दानवे हे उद्यापासून सभागृहात उपस्थित राहतील.
अंबादास दानवे यांना दिलासा, निलंबनाचा कालावधी कमी केल्यानं उद्यापासून सभागृहात राहणार हजर - breaking news today - BREAKING NEWS TODAY
Published : Jul 4, 2024, 10:44 AM IST
|Updated : Jul 4, 2024, 2:07 PM IST
मुंबई- हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाल्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, " खारघरमधील प्रकरणात एसआयटी म्हणजे मोठी धुळफेक आहे. देशात पंतप्रधान हेच मोठे बुवा आहेत. पंतप्रधानासारख वागा ना... पंतप्रधानांचे राजकारण हे भोंदूगिरीतून आहे. साधकांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला आहे. बुवाबाजी आहेत, तिथे राजकारणी जातात. बाबांना राज्यकर्ते प्रतिष्ठा देतात. भोलेबाबांवर गुन्हा दाखल न करणे म्हणजे राजकीय संरक्षण आहे."
LIVE FEED
अंबादास दानवे यांना दिलासा, निलंबानाचा कालावधी केल्यानं उद्यापासून सभागृहात राहणार हजर
मोक्याच्या जागा अदानींना, विरोध केल्यामुळे तुकाराम मुंढेची बदली- विजय वडेट्टीवार
विधानसभेत विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. "सरकारचे प्रकल्प केवळ अदानींसाठी आहेत. मोक्याच्या जागा अदानींना दिल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांनी विरोध केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. मुंबई बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आहे. भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे," असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
रोहित शर्मा, सुर्यकुमार यादवसह चार खेळाडुंचा विधिमंडळात सत्कार करावा- आमदार प्रताप सरनाईक
मुंबईत येणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करण्यासाठी लोकप्रतिनिधीदेखील उत्सुक आहेत. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल यांचा विधिमंडळात सत्कार करावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक हे विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहेत.
मणिपूरमध्ये 100% शांतता निर्माण झाल्याशिवाय आम्ही समाधानी होणार नाही-सुप्रिया सुळे
पुणे- लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका झाल्यानं आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, " अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येण्याचीदेखील वाट पाहत आहोत. या देशातील दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. कोणत्याही डेटाशिवाय आणि सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना अटक करण्यात आली. हे खूप खेदजनक आहे. देशातील जनतेवर, विशेषत: अशा घटनात्मक पदांवर असलेल्यांवर त्यांनी (सत्ताधारी पक्षानं) अन्याय केला आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावर बोलताना खासदार सुळे म्हणाले, "मणिपूरमध्ये 100% शांतता निर्माण झाल्याशिवाय आम्ही समाधानी होणार नाही. मणिपूरमध्ये स्त्रिया रडत आहेत. मुलांसह अनेक कुटुंब उद्ध्वस्त आहेत. अशा स्थितीत तुम्हाला मनःशांती कशी मिळेल?"