ETV Bharat / state

मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेण्याचं कारण काय? फायदा कुणाला मविआ की महायुतीला? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024

मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी माघार घेतल्यामुळं याचा फायदा मविआला होणार की महायुतीला होणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जाताहेत.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 4:25 PM IST

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यात मागील काही महिन्यांपासून रान पेटवलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी उपोषणही केलीत. नवी मुंबईत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर विधिमंडळ सभागृहात विशेष अधिवेशन बोलावून त्यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याला मान्यता दिलीय. मात्र मराठा, कुणबीसह सरसकट मराठ्यांना मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून, निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते उपोषणाचं हत्यार उगारणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी आपली ताकद दाखवली, याचा फटका महायुतीला बसला. तर मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाला सोबत घेऊन आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. काही ठिकाणी आपण उमेदवार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, सोमवारी (4 नोव्हेंबर) मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. पण अचानक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार का घेतली? याची कारणं काय आहेत? मनोज जरांगे निवडणूक न लढवतादेखील काही मतदारसंघात आपली ताकद दाखवू शकतात का? तसंच त्यांनी माघार घेतल्यामुळं याचा फायदा नक्की कोणाला? महाविकास आघाडीला की महायुतीला? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत. या सर्वांचं नेमकं कारणं काय? यावर एक नजर टाकू यात.

निवडणुकीत माघार घेण्याचं कारण काय? : मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. यामुळं ते बॅकफूटवरती गेले आहेत. त्यांनी अचानक आपली भूमिका बदलल्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. मराठा समाजाला जे आरक्षण देणार नाहीत, समाजाला जे न्याय देणार नाहीत, त्यांना आपण विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू, असं म्हणणारे मनोज जरांगे यांनी यू-टर्न का घेतला? याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. "मात्र एका जातीच्या मतावर लढणं शक्य होणार नाही, आपली ताकत कुठेतरी कमी पडेल आणि एका जातीच्या, एका समाजाच्या जीवावर उमेदवाराला मत मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत", असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. एका समाजाच्या किंवा जातीच्या जीवावर उमेदवारांना मतं मिळणार नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्याच मराठा समाजाने लाखोंच्यावर सभा त्यांनी घेतल्यात. मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतल्यामुळं मराठा समाज नाराज झाल्याचंही बोललं जातंय. कारण मराठा समाजाची निवडणुकीच्या माध्यमातून ताकद दाखवता आली असती, असं मराठा समाजातील काहींचं म्हणणं आहे.

खरं तर मतांमध्ये आपला समाज विभागला गेलाय आणि मराठा समाजानं राजकीय नेत्यांच्या नादाला न लागता किंवा त्यांच्याशी संबंध ठेवता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. मात्र मराठा समाजाचे अनेक नेते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच समाजही राजकीय नेत्यांशी संलग्न आहे. त्यामुळं कदाचित मनोज जरांगे यांना मतांचं विभाजन होईल आणि मराठा समाजातील उमेदवाराला अपेक्षित मतं मिळणार नाहीत ही भीती वाटली असावी, म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असल्याचं बोललं जातंय.

फायदा कुणाला मविआ की महायुतीला? : मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीनं सुटकेचा नि:श्वास टाकलाय. कारण मराठा समाजाची मतं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत. या मतांचं विभाजन होऊन महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतं मिळणार नाहीत. परिणामी थोड्याफार मतांच्या फरकानं महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांना फटका बसला असता किंवा जास्तीत जास्त महाविकास आघाडीला नुकसान झालं असतं, असं जाणकार आणि तज्ज्ञांचं मत आहे. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यामुळं याचा महाविकास आघाडीला गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्यामुळं त्याचा फटका महायुतीला बसला होता. महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरून मतं दिली होती. आताही मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल आणि फटका महायुतीला होईल, अशी चर्चा सुरू आहे.

बोलविता धनी कोण? : "मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण यामध्ये दोन वर्जन आहेत. दोन नावांमध्ये एक म्हणजे मनोज जरांगे यांचा बोलविता धनी शरद पवार आहेत आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस. जरी ही दोन्ही नावं नसली किंवा असली तरी याच्या व्यतिरिक्त तिसरा कोणीही एक व्यक्ती मनोज जरांगे यांचा बोलविता धनी असू शकतो. त्यांच्या इन्स्ट्रक्शनुसारच मनोज जरांगे हे आंदोलन, उपोषण करताहेत. आता मतांचं विभाजन होणार किंवा एका समाजाच्या किंवा एका जातीच्या जीवावर मराठा उमेदवारांना मतं मिळू शकत नाहीत आणि ते जिंकून येऊ शकत नाहीत, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतलीय. याचा लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीलाच फायदा होऊ शकतो," असंही राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलंय.

महायुतीचं नुकसान होणार : "सत्ताधारी महायुतीबाबत मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या मनात तीव्र भावना आहेत, त्या भावना त्यांनी लोकसभेत दाखवल्या आणि त्याचा फटका महायुतीला बसला. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत दिसून येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा बराच पाठिंबा मनोज जरांगे यांना आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी निवडणुकीत जी माघार घेतली, त्याचा फायदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष महाविकास आघाडीलाच होणार आहे. परिणामी महायुतीला याचा फटका बसून महायुतीचं नुकसान होईल," असंही राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा

  1. अमित ठाकरेंचं टेन्शन वाढलं; सदा सरवणकर निवडणूक लढवणार, सांगितलं 'हे' कारण
  2. पटोले म्हणतात, "रश्मी शुक्ला भाजपासाठी काम करतात"; आता शेलार म्हणाले, "नोटीस पाठवणार..."
  3. मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; लक्ष्मण हाके म्हणाले, "बारामतीमधून आदेश..."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.