मुंबई- राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडले असून, आता मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. महायुती आणि महाविकास आघाडीला दोन्ही बाजूला त्यांचीच सत्ता येईल, अशी अशा असतानाच आता एक्झिट पोलही समोर आलेत. 'मॅट्रिझ' एक्झिट पोलने महायुतीला 150-170 जागा आणि महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर इतर अपक्षांना 8-10 जागा मिळू शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं एक्झिट पोलनुसार स्पष्ट होतंय.
महायुतीला 160 हून अधिक जागा मिळतील : विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एक्झिट पोलच्या अंदाजांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. दीपक केसरकर हे शिंदेंच्या मंत्रिमंडळातही राज्यमंत्री आहेत. माझ्या अंदाजानुसार महायुतीला 160 हून अधिक जागा मिळतील. त्यामुळे आम्ही आधी सरकार कसे बनवू शकतो हे पाहणार आहोत. गरज पडल्यास आम्ही 10 ते 15 अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू शकतो, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलंय.
#WATCH | On exit poll predictions on Maharashtra elections, State Minister Deepak Kesarkar says, " my prediction is that we will cross 160 (seats) and 10-15 independents may join us...cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis along with ajit dada took a lot of effort to see… pic.twitter.com/ivGsdWY5aG
— ANI (@ANI) November 20, 2024
महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल : तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या विजयासाठी खूप कष्ट घेतलेत. अजित पवारांनी कल्याणकारी योजना राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांनी सर्व विभागात योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होते आहे की नाही याकडे जातीनं लक्ष घातलं आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या सरकारबद्दल जनतेची दिशाभूल करत असल्याचेही लोकांना समजलेय.त्यामुळे आता आमचंच सरकार येणार असल्याचंही दीपक केसरकरांनी बोलून दाखवलंय.
हेही वाचा-