ETV Bharat / state

कुटुंब रंगलंय प्रचारात, उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांच्या कुटुंबीयांची 'इलेक्शन ड्युटी' - FAMILY BUSY IN ELECTION CAMPAIGN

अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे कुटुंबीय पडद्यामागून निवडणुकीच्या विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळत असतात, तेच पुढे जाऊन उमेदवारीचे दावेदार बनतात, असे अनेक प्रकार राज्यात घडलेत.

maharashtra assembly election 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 12:30 PM IST

Updated : Nov 14, 2024, 5:09 PM IST

मुंबई- राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढत चाललीय. अशातच विविध उमेदवार आणि नेत्यांच्या आप्तस्वकीयांनी, कुटुंबीयांनीदेखील प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसू लागलंय. कुठे उमेदवाराची पत्नी, कुठे पती, काही ठिकाणी मुले तर काही ठिकाणी आई-वडील प्रचारात उतरल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळतंय. राजकारणातील घराणेशाहीचे किस्से संपता संपत नाहीत, मात्र या घराणेशाहीला उमेदवाराच्या प्रचारापासून प्रारंभ होतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक ठिकाणी जे कुटुंबीय पडद्यामागून किंवा थेटपणे प्रचारात आणि निवडणुकीच्या विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळत असतात, तेच पुढे जाऊन उमेदवारीचे दावेदार बनतात, असे अनेक प्रकार राज्यात घडलेत.

कोणत्या उमेदवारांचे कुटुंबीय प्रचारात? : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून, तर त्यांच्या कन्या सना मलिक अणुशक्ती नगर मतदारसंघातून रिंगणात आहेत. सना मलिकांच्या मतदारसंघात नवाब मलिक प्रचारात लक्ष घालून स्वतः अनेक ठिकाणी सहभागी होत आहेत. नवाब मलिकांचे भाऊ आणि माजी नगरसेवक कप्तान मलिक, बहीण माजी नगरसेविका डॉ. सईदा खान, नवाब मलिकांचे पुत्र फराज आणि अमीर हे सर्व कुटुंबीय प्रचारात सक्रिय झालेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तर त्यांचे बंधू मालाड पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे आशिष शेलारांच्या पत्नी प्रचारात उतरल्या आहेत.

शायना एनसी यांच्या मुलीची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर सक्रिय: अबू आझमींच्या प्रचारात त्यांचा मुलगा फरहान आझमी सक्रिय आहे. तर अणुशक्ती नगर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार फहाद अहमद यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी अभिनेत्री स्वरा भास्कर सक्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात त्यांचे बंधू माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर सक्रिय झालेत. जोगेश्वरी मतदारसंघातून शिवसेनेने मनीषा वायकर यांना उमेदवारी दिलीय, त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पती खासदार रवींद्र वायकर यांनी सांभाळलीय. विलेपार्ले मतदारसंघातून विद्यमान आमदार अॅड पराग अळवणी पुन्हा रिंगणात आहेत, त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका ज्योती अळवणी प्रचारात सहभागी दिसत आहेत. चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या प्रचारात त्यांची मुलगी सुप्रदा फातर्पेकर प्रचारात सक्रिय आहे.

शनाया मुनोत प्रचारात सहभागी: वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे रिंगणात आहेत, त्यांच्यासाठी त्यांचे वडील उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे प्रचारात सहभागी असल्याचं पाहायला मिळत आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेतर्फे वरुण सरदेसाई रिंगणात आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या मावशी रश्मी ठाकरेंचं प्रचारावर लक्ष आहे. माहीम मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वतः राज ठाकरे यांनी घेतली असून, अमित यांची आई शर्मिला ठाकरे आणि पत्नी मिताली देखील प्रचारात सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबादेवी मतदारसंघातून शिवसेनेतर्फे शायना एनसी निवडणूक रिंगणात आहेत, त्यांचे पती मनीष मुनोत आणि त्यांची मुलगी शनाया मुनोत प्रचारात सहभागी झाल्यात. शनाया वॉर रूमवर लक्ष ठेवून त्यामध्ये आपले योगदान देत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून रिंगणातून आहेत. त्यांच्या पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, मुख्यमंत्र्यांची सून प्रचारात सहभागी होत आहेत. मुंब्रा कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि कन्या नताशा सक्रिय झाल्यात. पदयात्रा, छोट्या प्रचारयात्रा, कॉर्नर बैठका, सोसायटी भेट अशा प्रकारे आव्हाड यांची पत्नी आणि मुलगी प्रचारात सक्रिय आहेत. मुंब्य्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नजीब मुल्ला रिंगणात उभे आहेत, त्यांनी आव्हाडांना आव्हान दिले आहे. मुल्ला यांच्या प्रचारात त्यांचे बंधू रिझवान मुल्ला आणि कुटुंबीय सहभागी झाले असून, मुंब्रा परिसरातील त्यांचे नातेवाईक देखील प्रचारात उतरले आहेत. ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका परिषा सरनाईक, पुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक प्रचारात उतरले आहेत. ठाणे शहर मतदारसंघातून माजी खासदार राजन विचारे रिंगणात आहेत, त्यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींचं महाविकास आघाडीला थेट आव्हान; म्हणाले, "राहुल गांधी यांच्या तोंडून..."
  2. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला! पंतप्रधान गृहमंत्र्यांसह लोकसभेचे विरोधी पक्षनेते आज घेणार प्रचारसभा

Last Updated : Nov 14, 2024, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.