ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमनं 31 जागा दिल्या तेव्हा ते चांगलं आणि आता..., अजित पवारांचं टीकास्त्र - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळतंय, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केलाय.

ajit pawar
अजित पवार (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 2:50 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलंय. महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळतंय, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केलाय.

...तर त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलेच नसते- अजितदादा : पहिल्यांदा महाविकास आघाडीचे आमदार शपथविधीसाठी सभागृहात बसले होते, मात्र काही वेळाने ते सर्व बाहेर निघून गेले. इतकी वर्षे मी त्यांच्यासोबत होतो, तेव्हा मी चांगला होतो. मी कुणासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले नाही ते सांगा, अशी विचारणा करीत मी जर दोषी असतो किंवा भ्रष्टाचारी असतो तर त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलेच नसते. मात्र सध्या ते राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु मी योग्य ठिकाणी न्याय मागत होतो आणि तो मला मिळाला आहे, असेही अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केलंय.

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमने 31 जागा महाविकास आघाडी दिल्या : आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केलंय. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमने 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. मात्र विधानसभेत महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला, तर ईव्हीएमला दोष द्यायला महाविकास आघाडीनं सुरुवात केलीय. लोकशाहीत प्रत्येकाला वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याचा उद्याचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा त्यांना सोमवारी कामकाजात भाग घेता येणार आहे, याबाबतची माहिती सर्वांना आहे. परंतु पहिल्याच दिवशी आम्ही संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळं करतोय. त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे, असा खोचक टोलाही अजित पवारांनी लगावलाय.

हेही वाचा :

  1. विधानसभा अध्यक्षपद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग
  2. अजित पवार यांना मोठा दिलासा : बेनामी संपत्ती जप्त प्रकरणात क्लीन चिट

Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.