ETV Bharat / state

दर्ग्याच्या दर्शनाकरिता गेलेल्या तिघांचा महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू, मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश - Mahad drown death news

महाडमधील सव गावातील दर्ग्यात दर्शनाला गेलेल्या महाबळेश्वरमधील तिघांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली.

Mahad drown death news
महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू, (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 10:33 PM IST

सातारा - महाबळेश्वरमधील तिघांचा महाडमधील सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर जेटीकडे गेलेल्या एकाचा पाय घसरून तो सावित्री नदीत पडला. त्याला वाचविताना अन्य दोघे पाण्यात पडले. तिघांनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमधील सख्खे भाऊ विवाहित होते.

तिघांच्या मृत्यूनं महाबळेश्वरवर शोककळा - दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुनावर शहाबुद्दीन नालबंद (रा. गवळी मोहल्ला, महाबळेश्वर) आणि जाहीद जाकीर पटेल (रा. रांजणवाडी, ता. महाबळेश्वर), अशी बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. दिलावर हे वेल्डिंग कारागीर होते. तर त्यांचा भाऊ मुनावर हे बांधकाम सुपरवायझर होते. सख्ख्या भावापैकी एकाची पत्नी मुले तर दुसऱ्या भावाचा मुलगाही दर्शनासाठी गेला होता. सव (ता. महाड) येथील दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर कुटुंबीय दर्गा परिसरात थांबले. तर तिघेजण जेटीकडे गेले.

महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू
महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू (Source- ETV Bharat Reporter)

निसरड्या पायरीमुळे झाला मृत्यू- जेटीजवळच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना निसरड्या पायरीनं घात केला. पायरीवरून एकाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या नादात इतर दोघेही पाण्यात पडले. त्यानंतर तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, घटनेनंतर महाड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळं महाबळेश्वरमधील गवळी मोहल्ल्यावर शोककळा पसरली आहे.

पोहता येत नसल्यानं तिघांनी गमावला जीव- सावित्री नदीकाठच्या जेटीजवळ पाण्याचा खोल डोह आहे. त्यातच तिघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशीरा त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा-

  1. डोळ्यादेखत भावंड नदीपात्रात बुडताना माऊलीनं दाखविलं प्रसंगावधान, नेसलेली साडी सोडून दोघांना वाचविलं! - Ahmednagar Floods News
  2. फिरायला गेलेली महिला समुद्राच्या भरतीमुळे बुडाली, जीवाची बाजी लावून पोलिसांनी वाचविले प्राण - Mumbai Police news

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.