ETV Bharat / state

अकोल्यात तिहेरी लढत; दोन मराठ्यांच्यात 'वंचित' टिकेल का? - Lok Sabha Elections

AKOLA LOK SABHA CONSTITUENCY : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचितकडून स्वत:ची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तर या मतदारसंघातून भाजपानं अनुप धोत्रे आणि मविआनं डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं अकोल्यात आता तिहेरी लढत बघायला मिळाणार आहे.

Lok Sabha Elections fight between Prakash Ambedkar Anup Dhotre and Abhay Patil in Akola
डॉ. अभय पाटील , प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 7:19 PM IST

अकोला AKOLA LOK SABHA CONSTITUENCY : अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. भाजपा, मविआ आणि वंचितनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, मविआ आणि भाजपानं यंदा मराठा कार्डचा पत्ता टाकल्यानं वंचितची चांगलीच गोची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं या तिहेरी लढतीत कोण विजयाचा एक्का ठरेल याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.

तिहेरी लढत : अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपानं माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ऐनवेळी मविआशी काडीमोड करत स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच मविआनं डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांपैकी प्रकाश आंबेडकर हे जवळपास 12 व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपाचे अनुप धोत्रे आणि मविआचे डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे.

अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात : अगोदर आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेत काम करणारे डॉ. अभय पाटील गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेस सोबत आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेव्हा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यंदाही मविआ आणि वंचितच्या युतीची चर्चा सुरू असल्यामुळं पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता होती. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर, मविआनं डॉ. अभय पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तसंच अभय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारालाही सुरुवात केली आहे.

दुसरीकडं प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी या दोन्ही नवख्या उमेदवारांसमोर आपले दंड थोपटले. ते जर यावेळी मविआसोबत असते तर त्यांच्या विजयाची शक्यता सर्वात जास्त असती, अशी चर्चा सध्या अकोला लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. त्यांच्या विजयासंदर्भात पोषक वातावरण असल्याचंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होते. परंतु, त्यांनी मविआची साथ न घेतल्यानं आता त्यांच्या विजयाचा मार्ग पुन्हा खडतर झाल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता भाजपा आणि मविआच्या मराठा कार्डमधून कोणत्या मराठा उमेदवाराला विजयाचा पेढा खायला मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. कमी कार्यकाळ बाकी असल्यानं अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय - Akola West Assembly By Election
  2. Vasant Chavan Info : 'वंचित'चा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा; काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा दावा - Lok Sabha Election
  3. "संजय राऊतांमुळंच आघाडीत बिघाडी"; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - prakash ambedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.