पुणे Lok Sabah Election 2024 : आपलाच उमेदवार निवडून येणार, असं सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटते. मात्र ही तर नुकतीच सुरुवात आहे, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. "ही निवडणूक देशाची आहे, त्यामुळे स्थिर सरकार देऊन मतदार संघाचा विकास कोण करू शकतो, याचा विचार मतदार करणार आहे. अद्याप सहा वाजणं बाकी आहे, सहा वाजतापर्यंत किती मतदान होते, हे पहावं लागेल. बारामती लोकसभा मतदार संघाच्या विकासाचा मुद्दा आहे. त्यामुळे ही पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक नाही. त्यामुळे आम्ही महायुतीचे सगळेच जणं सगळ्याच लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी काम करत आहोत," असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
बारामतीत 9 वाजेपर्यंत 5.77 टक्के मतदान : पुणे Lok Sabha Election 2024 Voting : बारामती लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.77 टक्के मतदान झालं आहे. बारामतीत सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी सकाळीच मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. मतदान करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या आहेत. बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, उपमुखमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मतदान केलं आहे.
ही पवार विरुद्ध पवार निवडणूक नाही : "लोकसभा निवढणूक ही पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक नाही. या निवडणुकीत देशाचे प्रश्न महत्वाचे असतात. त्यामुळे देशाचे प्रश्न आणि लोकसभा मतदार संघाचा विकास महत्वाचा आहे. महायुतीचे सगळे नेते मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक नाही," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
पराभवाच्या भीतीनं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली : बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीवरुन शरद पवार आणि अजित पवार यांच्या चांगलाच वाद पेटला आहे. रोहित पवार भरसभेत लढल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. एक्सवर पोस्ट करुन रोहित पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिलं. यात त्यांनी नमूद केलं आहे, की "दादा तुम्ही माझ्यावर परिणाम झाल्याचा आरोप केला, त्यानं मला काही फरक पडत नाही. मात्र परिणाम कोणावर झाला आणि पराभवाच्या भीतीनं कोणाच्या पायाखालची वाळू सरकली हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो. त्यामुळेच बारामती मतदार संघात पाण्यासारखा पैसा वाहतो. तुम्ही सात वेळा निवडणूक लढवली, पण असं काही केलं नसल्याचं सांगता. पण अजितदादा त्यावेळी आजच्या सारखं लक्ष्मी दर्शन घडवलं असतं, तर राष्ट्रवादीची राज्यात एकहाती सत्ता आणून तुम्ही मुख्यमंत्री असता, असं लोक म्हणतायत."
आमदार दत्ता भरणे यांनी मतदाराला केली दमदाटी?- बारामती लोकसभा निवडणूक ही शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर अजित पवार यांच्यासाठी अस्तित्वाची झालेली आहे. त्यामुळे दोन्हीकडे कार्यकर्ते सर्व प्रकारचे आयुध वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यात इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मतदाराला दमदाटी केलेली आहे. त्या ठिकाणावरून निघून जाण्याची धमकी दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे. दत्ता भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून ईटीव्ही भारत या व्हिडिओच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी देत नाही.
हेही वाचा :
- लोकसभा निवडणूक 2024 : राजकारणातील पातळी विरोधकांनी खालावल्यामुळे माझा आता विजय निश्चित-विशाल पाटील - Lok Sabha Election 2024
- काँग्रेसची इच्छा असती तर ते प्रज्वल रेवण्णाला देश सोडण्यापासून रोखू शकले असते- भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष - Lok Sabha Election 2024
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले... - lok sabha election 2024