ETV Bharat / state

महायुतीत जागावाटपाचं गणित बिघडलं, सहा जागांचा घोळ कायम; भाजपा शिवसेनेत रस्सीखेच - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Dispute For Six Seats In Mahayuti : महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असून शिवसेना शिंदे गटात आणि भाजपामध्ये सहा मतदारसंघांवरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Lok sabha Election 2024 Dispute For Six Seats In Mahayuti BJP and Eknath Shinde Group
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 4:04 PM IST

मुंबई Dispute For Six Seats In Mahayuti : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) दोन टप्पे पूर्ण झाले असून राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 मे हा शेवटचा दिवस आहे. मात्र, असं असताना महायुतीकडून राज्यातील 6 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा न झाल्यानं इच्छुक उमेदवारांबरोबर कार्यकर्त्यांची ही धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे ज्या 6 जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा बाकी आहे. त्या सर्व जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कोट्यातील आहेत. अशात या 6 जागांपैकी काही जागांवर भाजपाकडून अतिक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाण्यामुळं कल्याण-डोंबिवलीचा उमेदवार ठरेना : दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण-डोंबिवली, ठाणे, नाशिक आणि पालघर या 6 जागांवर अद्याप उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे. येत्या 1 ते 2 दिवसात या जागांची घोषणा केली जाईल, असं वक्तव्य मागील 15 दिवसांपासून दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून होत आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आणि त्याची तयारी करण्यासाठी फारच कमी कालावधी शिल्लक राहिल्यानं याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली असली तरी श्रीकांत शिंदे यांच्या पक्षाकडून अद्याप त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणं बाकी आहे. ठाण्यामध्ये अद्याप उमेदवाराची घोषणा न झाल्याकारणानं कल्याण-डोंबिवलीमध्ये अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा होण्यास उशीर होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला. परंतु, ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपाकडूनही दावा केला जात असल्यानं येथील चित्र अद्याप स्पष्ट नाही. तर या मतदारसंघातून शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेंद्र म्हस्के हे इच्छुक आहेत.

दक्षिण मुंबई आणि मुंबई उत्तर पश्चिममध्येही चढाओढ : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघावर शिंदे सेना आणि भाजपा या दोन्ही गटाकडून दावा केला जातोय. शिंदे गटाकडून या मतदारसंघात भायखळाच्या आमदार यामिनी जाधव तर भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच मंत्री मंगल प्रभात लोढा या दोन नावांची चर्चा आहे. परंतु एकनाथ शिंदे या मतदारसंघावर ठाम आहेत. त्यामुळं हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत मोठी उत्सुकता असून याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

दुसरीकडं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म सुद्धा दिलाय. अमोल कीर्तिकर हे 2 मे ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, या मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे आपल्या पुत्राविरोधात निवडणूक लढण्यास तयार नाहीत. तसंच या मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या दोन्ही नावास मनसेनं विरोध दर्शवल्यानं अशा परिस्थितीत या ठिकाणाहून शिंदे गटाकडून कुठला उमेदवार घोषित केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट : नाशिक लोकसभा मतदार संघावरुन अतिशय रंगतदार चुरस बघायला मिळत आहे. शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांना शिंदे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही आहे. उद्धव ठाकरे गटाकडून इथं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील या जागेवर दावा केला जातोय. परंतु, या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रमुख दावेदार असलेले छगन भुजबळ यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानं ही जागा कोणाच्या वाटेला जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

पालघर लोकसभेवर उमेदवारासह भाजपाची दावेदारी? : पालघर लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. भाजपा या ठिकाणाहून उमेदवारासह ही जागा आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. तर या मतदारसंघातून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं बोईसरचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपासमोर एकनाथ शिंदे, अजित पवार पूर्णतः हतबल : या विषयावर बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, महायुतीकडून विशेषत: भाजपाकडून जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत झुलत ठेवण्याचं कारण म्हणजे, त्यांना जास्तीत जास्त जागा त्यांच्या वाट्याला घ्यायच्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपासमोर पूर्णतः हतबल झाले आहेत. त्यांच्या हक्काच्या जागाही त्यांना भाजपाच्या नावानं सोडाव्या लागल्यात. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ज्या पद्धतीचे आकडे समोर आलेत, त्यांनी हे सुद्धा स्पष्ट झालंय की महाविकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणात जनाधार मिळत आहे. या कारणानं भाजपाला आता जास्तीत जास्त जागी विजय संपादन करणं फार गरजेचं आहे. तसंच मित्र पक्षांच्या जागा आणि प्रसंगी उमेदवार सुद्धा आपल्यासोबत घेऊन त्यांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यास ते भाग पाडत असल्याचंही माईणकर म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, "पालघर लोकसभा मतदारसंघाचं सांगायचं झालं तर विद्यमान शिंदे गट शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. राजेंद्र गावित हे मुळात काँग्रेसचे आहेत. अशा परिस्थितीत राजेंद्र गावित कमळ चिन्हावर निवडून आल्यास त्याचा भाजपाला फायदा होईल. म्हणून भाजपा पक्षासह उमेदवाराचीही मागणी करत आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना भाजपाला जागा सोडण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय नाही. कार्यकर्त्यांची कितीही नाराजगी समोर आली तरीही एकनाथ शिंदे हे भाजपासमोर पूर्णतः हतबल झालेत."

हेही वाचा -

  1. महायुतीतील जागा वाटपावर नेत्यांच्या उघड वक्तव्यामुळं दिल्लीतील नेते नाराज? कोणत्या जागांचा तिढा कायम? - Lok Sabha Election 2024
  2. नाशिक आणि कोकणात 'कमळावर बाण' ताणलेलाच, दोन्ही मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने ठोकला दावा - Lok Sabha Election 2024
  3. सुरुवातीलाच कमी जागा मिळाल्यामुळे 16 जागा मिळवण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील का? - Shinde Group Seats Allocation

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.