Life threat to Dr Ajay Taware and Dr Harnolkar : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केलीय. याबाबत आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हाळनोर यांना अटक झाली असून या दोघांची सुरक्षा महत्वाची आहे. हे दोघं अटकेत आहेत. यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आणि पोलिसांची आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याची शंका सुषमा अंधारेंनी व्यक्त केलीय. पुण्यात शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही शंका उपस्थित केलीय.
अनेक प्रश्न उपस्थित : यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मला जे काही बोलायचं आहे, ते मी 4 जून नंतर बोलणार आहे. 4 जूनला निकाल आहे. पोलिसांचं काम मला वाढवायचं नाही. अजय तावरे आणि हाळनोर यांना अटक झालीय. या दोघांची सुरक्षा महत्वाची आहे. हे दोघे अटकेत आहेत. यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आणि पोलिसांची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. आर्यन खान आणि सिंघनिया प्रकरणात पुढं काय झालं? काय सुनावणी झाली हे पुढं आलं नाही. गोसावी आणि प्रभाकर साहिलचं पुढं काय झालं? तसंच प्रभाकर हा मुख्य पुरवा होता पण त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. तसंच ललित पाटीलनं देखील मला फसवलं गेलं असं सांगितलं होतं. माझ्याकडे नावं आहेत असं सांगितल होतं. पुढं त्याचं काय झालं, हे पुढं आलं नाही. या प्रकरणी देखील पुरावे मिटवले जात आहेत. अजय तावरे फक्त ब्लड प्रकरणी नाही तर गेली 10 वर्ष त्यानं काय काय केलं आहे. तसंच मंत्रालयाच्या 6 व्या मजल्याचा नेमका काय संबंध आहे असे अनेक प्रश्न यावेळी सुषमा अंधारेंनी उपस्थित केले.
चौकशी योग्य कशी मानायची : ससून हॉस्पिटलच्या चौकशी समितीमधील पल्लवी सापळे यांच्यावर आक्षेप आहेत. त्यांनी केलेली चौकशी आम्ही योग्य कशी मानायची असा सवाल देखील यावेळी अंधारेंनी उपस्थित केलाय.
हेही वाचा :