ETV Bharat / state

साईंच्या मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन, पाच कोटींच्या आभूषणांनी साईंना मढवले

साईबाबांच्या मूर्तीला सुवर्ण हिरेजडीत 4 किलो 800 ग्रॅम वजनाची आभूषणे चढविण्‍यात आलीत. त्‍याची अंदाजे रक्‍कम 1 कोटी 29 लाख 69 हजार 495 रुपये इतकी आहे.

साई मंदिरातील दिवाळी
साई मंदिरातील दिवाळी (ईटीव्ही भारत बातमीदार)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2024, 6:51 PM IST

Updated : Nov 1, 2024, 8:59 PM IST

शिर्डी (अहिल्यानगर) - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दीपावली निमित्‍त श्री लक्ष्‍मी पूजन उत्‍सव साजरा करण्‍यात आला. आज सायंकाळी 5 ते 5.55 यावेळेत समाधी मंदिराच्‍या गाभाऱ्यात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्‍यांच्‍या पत्‍नी वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते लक्ष्‍मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्‍मी-कुबेर पूजन, सरस्‍वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे असे कार्यक्रम झाले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडूळे, लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी, मंदिर प्रमुख विष्‍णु थेरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ तसंच साईभक्‍त मोठ्या संख्‍येनं उपस्थित होते. लक्ष्‍मी-कुबेर पूजन झाल्‍यानंतर सायंकाळी 6 वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्‍तांसाठी दर्शनरांग सुरू करण्‍यात आली.

दीपावली उत्‍सवानिमित्‍त जालंधर, पंजाब येथील साईभक्‍त मानव खुराणा, यांच्‍या वतीने देणगीस्‍वरुपात विद्युत रोषणाई श्री साईबाबा समाधी मंदिरात परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली. साईंबाबांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी द्वारकामाईत दिवे लावण्यासाठी कोठुनही तेल न मिळाल्यानं त्यांनी पाण्याने दिवे लावल्याचा चमत्कार केला होता असं सांगितलं जातं. त्यामुळे आजही शिर्डीत अनेक साईभक्त दीप लावून साईंची ही आठवण ताजी करतात. देशभरातील विविध ठिकाणाहून साईभक्तांनी शिर्डीला येऊन साईबाबांच्या द्वारकामाई समोरील लेंडीबागतील प्रांगणात लक्ष्मीची पूजा मांडत लक्ष्मी पूजन केलं.

साई मंदिरातील दिवाळी (ईटीव्ही भारत बातमीदार)

आज दिवाळीच्या दिवशी सर्वत्र गोडधोड जेवण केलं जातं. मात्र शिर्डीत फकीराचे जीवन जगलेल्या साईबाबांनाही आज साईभक्तांनी सोन्याचांदीने मढवले आहे. सण उत्सवाला साईबाबांना सोन्याच्या ताट-वाट्यात नौवेद्या दाखवला जातो. साईंना आज सोन्याचे ताट असले तरीही साईबाबांचा संध्याकाळाचा नैवेद्य हा पिठल-भाकर कांदा असाच असतो.

दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने शिर्डीत साजरा केला जातो. साईबाबांना भाविकांनी अर्पण केलेली सुवर्ण आभूषणे ,चोपडीचे पूजन करण्यात आलं. त्यानंतर धूपारती पार पडली. दीपावली निमित्ताने साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाबांच्या मूर्तीला आज खास श्रृंगार परिधान करण्यात आला आहे. साईमंदिरासमोर फुलांची सजावट करत त्यावर दिवे लावण्यात आले आहेत.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी सुमारे साडेसहा हजार कर्मचारी अधिकारी तैनात आहेत. वाहनचालक-मालक, लॉजमालक, कर्मचारी, छोटे-मोठे व्यावसायिक व मजूर यांची गणती केली तर एक लाखाहून अधिक कुटुंबांमध्ये बाबांच्या कृपेनं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या लक्ष्मी येते. लक्ष्मीपूजनानिमित्त या कुटुंबातील अनेकांच्या घरात लक्ष्मीबरोबरच साईंचाही फोटो ठेवून पूजन केलं जातं काही भाविकांनी लेंडीबागेत आपल्या कुटुंबीयांन समवेत लक्ष्मीपूजन केलं.

साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाचा थाटमाट काही औरच असतो. पूजेसाठी सोन्याचे ताट, पंचारती, घंटी, समई, निरंजन, पळी-पंचपात्र, पाट आणि भांडीही सोन्याची असतात. बाबांच्या मूर्तीवर रत्नजडित सुवर्णहार, असे पाच कोटीचे दागिनेे घालन्यात आले. शंभर किलो वजनाच्या सोन्याने मढवलेले साईंचे सिंहासन सुवर्णतेजाने तळपणारा साई मंदिरावरील सुवर्णकळस बाबांच्या दरबारातील वैभवाची साक्ष देतात. बाबांच्या दरबारात सदैव रिद्धी-सिद्धी नांदते. या श्रद्धेनं अनेक भाविक बाबांच्या दरबारातील लक्ष्मीपूजनात आपले पैशाचे पाकीट ठेवतात. पूजेनंतर ते ठेवणाऱ्यांच्या हवाली केले जाते. लक्ष्मीपूजनाचा दिवस साईदर्शन घेऊन दिवाळी साजरा करणारे अनेक भाविक या निमित्तानं शिर्डीत येतात. लाखांचे पोशिंदे असलेल्या बाबांच्या दरबारातील लक्ष्मीपूजन असे आगळेवेगळे आणि थाटामाटात होत असते.

Last Updated : Nov 1, 2024, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.