ETV Bharat / state

धक्कादायक! कोयना एक्स्प्रेसनं तीन महिलांना चिरडलं; अपघात की आत्महत्या, याबाबत उलट सुलट चर्चा - Koyna Express Accident - KOYNA EXPRESS ACCIDENT

Koyna Express Accident News : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (14 जून) रात्री उशिरा घडली. या दुर्घटनेत दोन महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला.

Koyna Express Accident
कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तिघींचा मृत्यू (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 10:03 AM IST

कोल्हापूर Koyna Express Accident News : मुंबईतून कोल्हापुरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसनं तीन महिलांना चिरडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. तर रुळावरुन चालत येत असताना ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं ही दुर्घटना अपघात की आत्महत्या याबाबत शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला दिली आहे.

नेमकं काय घडलं? : मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातील मार्केट यार्डपासून पुढं छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानकडं येत असताना कोयना एक्स्प्रेसची तिघींना जोराची धडक बसली. या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि मुलगी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या. तिघींच्या अंगावरुन रेल्वेचं चाक गेल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत्यू झालेल्यांपैकी एक महिला 40 ते 45 तर दुसरी महिला 25 ते 30 वयोगटातील आहे. तर त्यांच्यासोबत असणारी लहान मुलगी दहा ते बारा वर्षांची असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. रुळावर धडक बसताच लोको पायलटनं रेल्वेचा वेग कमी करत ती काही अंतरावर थांबवली. रेल्वे अचानक थांबल्यानं परिसरातील नागरिकही रुळाच्या दिशेनं आले. यावेळी तिघींचे मृतदेह आढळून आले. लोको पायलटनं ही माहिती रेल्वेगार्डला तर रेल्वेगार्डनं ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

पादचारी पूल असूनही झाली दुर्घटना : घटना घडलेल्या ठिकाणी एका बाजूला वस्ती आहे. दुसऱ्या बाजूला काहीशी विरळ वस्ती आहे. या ठिकाणी पायवाट देखील आहे. त्यावरुन लोक ये-जा करत असतात. मात्र, या ठिकाणाहून दोन्ही बाजूंनी येणारी रेल्वेगाडी दूर अंतरावरुनही दिसते. त्यामुळं रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात घडल्याची शक्यता कमी आहे.

मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत : "रात्री उशिरापर्यंत या मृतांची ओळख पटली नाही. पोलिसांनी तिन्ही मृतदेह सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं," अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

हेही वाचा -

  1. बालासोरप्रमाणं रेल्वे अपघात टळला! पंजाबमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक, नेमकं काय घडलं? - Fatehgarh Sahib Train Accident
  2. लोकलमध्ये मोबाईल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, पोलिसांचा शोध सुरू - Railway Accident
  3. जामतारा येथे रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.