ETV Bharat / state

कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडले, ११०५० क्युसेक्स पाणी सोडलं - Koyna Dam Satara

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 6:29 PM IST

Koyna Dam Satara : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे.

koyna dam
कोयना धरणाचे दरवाजे उघडले (ETV Bharat Reporter)

सातारा Koyna Dam Satara - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी पाच वाजता उघडण्यात आले आहेत. दरवाजांतून १० हजार क्युसेक्स आणि पायथा वीजगृहातून १०५०, असा एकूण ११०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरा धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग २०,००० हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे.

कोयना धरणात 85 हजार क्युसेक्स पाण्याची आवक : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक 85 हजार क्युसेक्सवर पोहचली आहे. गुरू संध्याकाळी ५ वाजता धरणामध्ये एकूण ७८.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दिवसभर कोयनानगर येथे ९० मिलीमीटर, नवजा येथे ७० आणि महाबळेश्वर येथे ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : सद्यस्थितीत कोयना धरणाच्या सांडव्यावरून (सहा वक्र दरवाजे) प्रतिसेकंद १०,००० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तथापि, पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी संध्याकाळी ७ वाजता सांडव्यावरील विसर्गात वाढ करून २०,००० क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कण्हेर, वीर धरणातूनही पाणी सोडलं : सातारा जिल्ह्यातील कण्हेर आणि वीर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वेण्णा तसेच नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कण्हेर धरणातून प्रति सेकंद ७००० क्युसेक्स तर वीर धरणातून ५५,००० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानं वेण्णा, नीरा नदीला पूर आला आहे.

हेही वाचा - राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा, प्रशासन हाय अलर्टवर - Kolhapur Floods

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.