मुंबई Confusion in Chief Minister meeting : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, यावेळी गोंधळ झाल्यानं बैठकीत स्थगित करण्यात आली. आयुक्तांनी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत कथित वादग्रस्त विधान केल्यानं गोंधळ उडाला. तसंच बैठकीत बोलू दिलं जात नसल्यानं कोळी समाजाच्या बांधवांनी बाहेर पडत गोंधळ घातला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
वादग्रस्त वक्तव्यामुळं : राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या जात प्रमाणपत्राबाबत आज राज्य सरकारनं बैठक बोलावली होती. या बैठकीत आयुक्तांनी जात प्रमाणपत्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळं आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया कोळी समाजातील बांधवांनी दिलीय.
त्वरित कारवाईची मागणी : "आज आम्हाला कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी बैठकीला बोलवण्यात आलं होते. मात्र बैठकीत आमची भूमिका मांडू दिली नाही. त्यामुळं आमच्यावर अन्याय झालाय. बैठकीतच मुख्यमंत्र्यांसमोर आम्हाला बोगस, म्हणण्यात आलं. हा कोळी बांधवांचा अपमान आहे. म्हणून आम्ही बैठकीतून बाहेर पडलो. यानंतर बैठक स्थगित करण्यात आली. परंतु ज्यांनी आम्हाला बोगस म्हटलं त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी," अशी आमची मागणी असल्याचं कोळी समाजातील महिलांनी म्हटलं.
आमदारांनाही बोलू दिलं नाही : "कोळी समाजाची जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत समाजातील काही बांधव, प्रशासकीय अधिकारी, आमदारांनी बैठक सुरू असताना आयुक्तांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. तसंच आमच्या मतदारसंघातील आमदार लताताई सोनवणे त्यांनाही बोलू दिलं नाही. त्यांनी आम्हाला भूमिका मांडू दिली नाही. त्यामुळं कोळी बांधव संतप्त झाले. आमचा प्रश्न सोडवायचा नसेल तर आम्हाला विषाची बाटली द्या, आमच्या कुटुंबाला संपून टाका," असा संताप कोळी बांधवांनी व्यक्त केला.
हे वाचलंत का :
- विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS
- आसामसह केरळच्या मदतीला धावला महाराष्ट्राचा सह्याद्री, तातडीनं २० कोटींची मदत जारी - MH gov disaster relief
- मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडमध्ये; बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी उपाययोजना - Bangladesh Riots