ETV Bharat / state

लाडका 'बाल्या' गेला! श्वान स्पर्धेत जिंकली होती अनेक पारितोषिकं; प्रिय श्वानाच्या निधनानंतर मालकानं 400 जणांना केलं अन्नदान - Kolhapur News

Kolhapur Dog News : कोल्हापुरातील एका कुटुंबानं आपल्या लाडक्या श्वानाच्या निधनानंतर त्याच्यावर एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्यांनी 400 जणांना अन्नदानही केलं.

Kolhapur News Balya who won many prizes in dog competition passes away, owner anna daan to 400 people after death of beloved dog
प्रिय कुत्र्याच्या निधनानंतर मालकानं 400 जणांना केलं अन्नदान (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 7:03 PM IST

कोल्हापूर Kolhapur Dog News : जंगली चपळ चित्त्याप्रमाणे त्याची धाव, मालकाची झलक दिसताच वाऱ्याप्रमाणं धावणारा 'बाल्या' नावाचा श्वान कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोणत्याही शर्यतीत नसेल तर ती शर्यत जणू अपूर्णच. गेली दहा वर्ष शर्यतीमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या बाल्याचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. लाडक्या बाल्याच्या जाण्यानं व्याकूळ झालेल्या व्हरगे कुटुंबानं घरातील सदस्याप्रमाणे त्याचा अंत्यविधी केला. दोन दिवसांपूर्वी बारावं त्याचं श्राद्ध घालून 400 जणांना अन्नदान करण्यात आलं. पाळीव प्राण्याप्रती व्यक्त झालेल्या या संवेदनांनी अनेक कोल्हापूरकर हळहळले.

प्रिय श्वानाच्या निधनानंतर मालकानं 400 जणांना केलं अन्नदान (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचगावात राहणाऱ्या दीपक व्हरगे यांनी 2011 साली श्वानाचं पिल्लू घरात आणलं होतं. 'बाल्या' हा लहानपणापासूनच धावण्यात तरबेज होता. यामुळं कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये होणाऱ्या श्वान स्पर्धेत तो सहभागी व्हायचा. अल्प कालावधीतच बाल्याची लोकप्रियता कमालीची वाढली. गेल्या दहा वर्षात त्यानं कोणतीही श्वानस्पर्धा विजयी न होता सोडलेली नव्हती. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात झालेल्या श्वान स्पर्धांमध्ये त्यानं अनेक पारितोषिकं पटकावत आपले मालक दीपक व्हरगे यांची महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सलग सहा चॅम्पियनशिप जिंकल्यामुळं कोल्हापूरसह सीमा भागात त्याला 'हिंदकेसरी बाल्या' म्हणूनही ओळखलं जायचं. घरच्या सदस्याप्रमाणे असलेल्या या श्वानाचं 4 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्याच्या निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटाही पाळण्यात आला.

बाल्यामुळं पाचगावचा नावलौकिक वाढला : पाचगावच्या व्हरगे कुटुंबीयांनी बाल्याचा 14 वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. कर्नाटक महाराष्ट्रासह अनेक स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या बाल्यामुळं पाचगावचा नावलौकिक वाढला होता. करवीर तालुक्यातील पाचगावला बाल्याचं गाव म्हणून ओळखलं जातं, ही समाधानाची बाब असल्याचं माजी सरपंच संग्राम पाटील म्हणाले.

घरातील दिवसाचा पहिला चहा 'बाल्याला' : व्हरगे कुटुंबात गेली 15 वर्षे दिवसाचा पहिला चहा लाडक्या बाल्यासाठीच असायचा. बाल्याला दूध, भाकरी, अंडी, मटण, पैलवानांचा असणाऱ्या खुराकापैकी काजू, बदाम, पिस्ता यासारखे पौष्टिक अन्नपदार्थ दिले जात असल्यानं बाल्याची तंदुरुस्ती उत्तम टिकू शकली, असं त्याचे पालनकर्ते दीपक व्हरगे म्हणाले.

हेही वाचा -

  1. राज ठाकरेंचं श्वानप्रेम पुन्हा आलं समोर, भटक्या कुत्र्यांची थेट पदाधिकाऱ्यांवरद दिली जबाबदारी! - Raj thackeray
  2. सावधान, पालकांनो मुलाकडं द्या लक्ष! महिनाभरापूर्वी श्वान चावल्यानंतर चिमुकल्याचा झाला मृत्यू - dog bite death
  3. मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात आहेत 32 श्वान, प्रथमच काढण्यात येणार 'इतक्या' श्वानांचा विमा - dog squad will be insured

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.