ETV Bharat / state

राजर्षी शाहू महाराजांना 'भारतरत्न' द्या; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी - Rajarshi Shahu Maharaj Jayanti

Rajarshi Shahu Maharaj Jayanti : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 व्या जयंती साजरी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी असल्याचं सांगितलं.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti
Rajarshi Shahu Maharaj Jayanti (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 11:37 AM IST

कोल्हापूर Bharat Ratna To Chatrapati Shahu Maharaj : सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना 'भारतरत्न पुरस्कारा'नं सन्मानित करावं, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीय. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त कोल्हापुरातील 'लक्ष्मी विलास पॅलेस' या शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आज विविध उपक्रम राबवले जात आहेत.

हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी (Source - ETV Bharat Reporter)

मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज छायाचित्र दालनाला भेट दिली. तसेच त्याठिकाणी आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाच्यावतीनं शोभायात्रेचं आयोजन : जिल्ह्याचा मानबिंदू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्तानं जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य शोभायात्रेचं आयोजन कऱण्यात आलं आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावरील मालिकेमध्ये त्यांची भूमिका साकारणारे राहुल सोलापूरकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

अशी असणार शोभायात्रा : शोभायात्रेचा प्रारंभ दसरा चौकातून होणार असून ही शोभायात्रा बिंदू चौक - मिरजकर तिकटी - बिन खांबी गणपती - महाद्वार रोड - पापाची तिकटी - सीपीआर हॉस्पिटल - समाधी स्थळ या मार्गाने जाणार आहे. या शोभायात्रेमध्ये विविध प्रशालांचे बोर्डिंगचे साधारणपणे 18 ते 20 चित्ररथ असणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनपटातील प्रसंग या चित्ररथातून दर्शविले जाणार आहेत. तसेच चार हजार शालेय बोर्डिंगचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत. शोभा यात्रेमध्ये लेझीम पथक, ढोल पथक, मर्दानी खेळ, कोल्हापूर जिल्ह्यातील मल्ल, घोडेस्वार, बग्गी मध्ये स्वार झालेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे प्रमुख आकर्षण असणार आहे. ही शोभायात्रा पाहण्यासाठी व शाहू महाराजांना अभिवादन करण्याकरिता जिल्हयातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शोभा यात्रेत सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केलं आहे.

हेही वाचा

  1. नीट घोटाळ्यात बीड कनेक्शन: बीड, माजलगावमधील दोघांची संशयितामध्ये नावं, शिक्षण क्षेत्राला हादरा - NEET Paper Leak Beed Connection
  2. मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले मुलाच्या विवाहाचं निमंत्रण - Breaking News Today
  3. भाडेकरूला काढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याचं मुन्नाभाई स्टाईल आंदोलन, पाहा काय आहे प्रकार? - Sambhajinagar Crime News
  4. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान; जनतेचा कौल कुणाला मिळणार? - Vidhan Parishad Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.