कोल्हापूर Kolhapur Airport Terminal Inauguration : देशातील सात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचाही समावेश होता. या नवीन टर्मिनलचं लोकार्पण आज (10 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीनं करण्यात आलं. या कार्यक्रमांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असं मत व्यक्त केलं. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील हे देखील उपस्थित होते.
नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी : कोल्हापूरसह अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती, ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, जबलपूर, दिल्ली आणि लखनौ येथे नवीन तसंच सुधारित विमानतळ टर्मिनल इमारतींचं उद्घाटन. तर कडप्पा, हुब्बल्ली, बेळगावी येथे नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाली.
पहिला टप्प्यातील विकासकामं पूर्ण : भारतीय विमानतळ प्राधिकरणानं 255 कोटी खर्चुन A-320 प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. दोन टप्प्यात धावपट्टी आणि संबंधित कामांच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून 65 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. तर सध्या उपलब्ध असलेल्या जागेत पहिला टप्प्यातील विकासकामं पूर्ण झाली आहेत.
हस्तकला उद्योगाच्या वाढीस मदत : नवीन टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 3900 चौ.मी असून तासी प्रवाशी क्षमता 500 आहे, आणि वार्षिक क्षमता 5 लाख प्रवाशी आहे. वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगार निर्मितीला चालना देणं कोल्हापूरच्या आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळं या भागातील हस्तकला उद्योगाच्या वाढीस मदत होईल ज्यात कापड, चांदी, मणी, पेस्ट दागिन्यांची हस्तकला, मातीची भांडी, लाकूड कोरीव काम, लाखेची भांडी, पितळी पत्रे, ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर आर्टवर्क आणि भरतकाम यांचा समावेश आहे.
हेही वाचा -
- "कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्या", खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी
- Kolhapur airport : विमानतळासाठी प्रशासनाकडून सक्तीने जमीन खरेदीविरोधात जमीन धारकांची उच्च न्यायालयात धाव
- Kolhapur Mumbai Airlines : कोल्हापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू, संजय घोडावत यांनी केली 'ही' अपेक्षा व्यक्त