ETV Bharat / state

साडेतीनशे वर्षांपूर्वी परदेशातील टाइल्स, झुंबरनं सजलं दिगंबर जैन मंदिर; अचलपूरचं आहे ऐतिहासिक वैभव - Jain Temples Amravati - JAIN TEMPLES AMRAVATI

Jain Temples Amravati : अचलपूर येथील साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं 'दिगंबर जैन मंदिर' (Digambar Jain Temple) हे जैन बांधण्यासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. अचलपूर मधील सुलतानपुरा परिसरात महावीर पेठेतील या अतिशय सुंदर दिगंबर जैन मंदिरासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Digambar Jain Temple
दिगंबर जैन मंदिर (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 11:01 PM IST

Updated : Jul 26, 2024, 9:02 AM IST

अमरावती Jain Temples Amravati : अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर अशी ओळख असणाऱ्या अचलपूरमध्ये साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं 'दिगंबर जैन मंदिरा'ला अचलपूरच्या वैभवात मोठा मान आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी युरोप देशामधून आणलेल्या टाइल्स, झुंबर आदी वस्तूंनी हे मंदिर सजवण्यात आलं आहे. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर भव्य दिव्य अशा महालात आपण आलो की काय असा भास या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला होतो.

प्रतिक्रिया देताना अतुल कळमकर (ETV BHARAT Reporter)

ईलीचपुर होतं जैन धर्मियांचे प्रमुख केंद्र : हजारो वर्षांपूर्वी 'ईलीजपूर' म्हणजे आजचे 'अचलपूर' हे जैन धर्मियांचे प्रमुख केंद्र होतं. ईलीच राजाच्या काळात या इलीजपूरमध्ये एकूण बावनपुरे अर्थात 52 पेठा होत्या. आज देखील हे बावनपुरे अचलपूरमध्ये कायम आहेत. पूर्वी या सर्व बावनपुऱ्यांमध्ये जैन मंदिर होती. इ.स 1020 ते 1030 दरम्यान अफगाणिस्तानातून भारतात मुस्लिम आक्रमणाच्या काळात ईचलपूर येथील बावनपुऱ्यांमध्ये असलेल्या जैन मंदिरातील शंभर ते दीडशे सुंदर अशा जैन मुर्त्या जैन धर्मियांची काशी अशी ओळख असणाऱ्या मुक्तागिरीच्या पहाडावरील जैन मंदिरांमध्ये हलविण्यात आल्या.

सुलतानपूर येथील जैन मंदिराचा असा आहे इतिहास : सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी राजस्थानमधील बघेर या ठिकाणावरून अनेक जैन धर्मीय बांधव विदर्भात आलेत. यापैकी अनेक जैन धर्मीय बांधव हे जैन धर्मियांचे मुख्य केंद्र असणाऱ्या ठिकाणांपैकी एक अशा अचलपूर येथे स्थायिक झालेत. राजस्थानमधून येताना जैन धर्मीय बांधवांनी उंटांवरून त्यांच्याकडील अनेक साहित्य अचलपूरला आणलेत. त्यामध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती देखील होत्या. या जैन बांधवांमध्ये अतुल कळमकर यांचं कुटुंब देखील अचलपूरला आलं. "जैन धर्मियांमध्ये देवाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण केलं जात नाही. यामुळे लालसा नोतीसा यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सुलतानपुरा परिसरात या दिगंबर जैन मंदिराची स्थापना केली. हे कळमकर कुटुंबीयांचं वैयक्तिक मंदिर आहे," अशी माहिती अतुल कळमकर यांच्यासह या मंदिराची संपूर्ण व्यवस्था पाहणारे विलास कस्तुरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

1850 मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार : 19 व्या शतकात भारतात इंग्रज, पोर्तुगीज असे व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने आलेत. याच काळात 1850 मध्ये अचलपूर येथील दिगंबर जैन मंदिराचा जिर्णोद्धार नथुसा कळमकर यांच्या वतीनं करण्यात आला. त्यावेळी या मंदिरात लाल, हिरव्या, पिवळ्या अशा बहुरंगी टाइल्स इटलीमधून आयात करण्यात आल्या. यासह मंदिरासाठी गालीचे आणि झुंबर देखील परदेशातून बोलविण्यात आलेत. आमच्या पूर्वजांनी या परदेशी साहित्याद्वारे हे मंदिर सजवलं असल्याचं अतुल कळमकर यांनी सांगितलं.

मंदिराचा जिर्णोद्धार करणाऱ्या कारागिरांचे प्रवेशद्वारावर पुतळे : अचलपूरच्या सुलतानपुरा परिसरात असणाऱ्या या जैन मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिराचा जिर्णोद्धार करणाऱ्या दोन कारागिरांचे पुतळे कोरण्यात आले आहेत. विविध रंग, आकृत्या आणि तीर्थंकरांच्या लहान मोठ्या मुर्त्यांनी हे प्रवेशद्वार सजल आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतात एखाद्या राजवाड्यात आपण आलो आहोत असाच अनुभव येतो. हे दिगंबर जैन मंदिर ताजमहल इतकंच सुंदर म्हणून ओळखल्या जात असल्याचं सुलतानपुरा परिसरातील रहिवासी सांगतात.

मंदिराचं असं आहे वैशिष्ट्य : या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जैन तीर्थंकरांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. यासह अष्टधातूच्या देखील लहान मुर्त्यांचे दर्शन या मंदिरात होतं. काही ताम्रपट देखील या मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवली आहेत. या मंदिराची फरशी, छत, चारही बाजूच्या भिंती चकचकीत अशा विविध रंगाच्या टाइल्सनं सजल्या आहेत.

हेही वाचा -

  1. मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी; गुरांना चारा, पाणी मिळावं यासाठी सहा महिन्यासाठी केलं होतं स्थलांतर
  2. मेळघाटात एकाच ठिकाणी आहे दक्षिण आणि उत्तरवाहिनी 'ब्रह्मसती' देवी; जाणून घ्या इतिहास
  3. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार

Last Updated : Jul 26, 2024, 9:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.