ETV Bharat / state

दुचाकीवरुन जाताना किर्तनकार महाराजांवर बिबट्याचा हल्ला, महाराजांसह बिबट्याही जखमी - Bhagwat Prakash Tikhandke

Kirtankar Bhagwat Prakash Tikhandke : कीर्तनकार भागवत प्रकाश तिखांडके (वय 24) हे शेंडीवरून उडदवणे येथे जात असताना रात्री 12.30 वाजता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये बिबट्याचा नेम चुकल्याने मोटरसायकलच्या मागच्या बाजूला बिबट्याची धडक बसली. त्यामुळे तिखांडके महाराज आणि बिबट्याही जखमी झाला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 3:54 PM IST

Updated : Apr 7, 2024, 4:22 PM IST

अहमदनगर Kirtankar Bhagwat Prakash Tikhandke : अकोले तालुक्यातील गुहिरे येथील कीर्तनकार भागवत प्रकाश तिखांडके महाराज यांच्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र, बिबट्याचा नेम चुकल्यानं दुचाकीच्या मागच्या बाजुला बिबट्याची धडक बसली. त्यामध्ये तिखांडके महाराज आणि बिबट्याही जखमी झाले. दरम्यान, गाडीचा मोठा आवाज झाल्यानं बिबट्या जंगलात पळून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जिल्ह्यात अनेक भागात बिबट्याचा वावर हा सध्या नित्याचाच झाल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागात विशेषतः उत्तरेकडं बिबट्याचं प्रमाण जास्त आहे. बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना या नेहमीच समोर येत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

दुचाकीच्या मागच्या बाजुला बसली धडक : कीर्तन करुन घरी जात असताना किर्तनकार भागवत महाराज तिखांडके महाराजांवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली. कीर्तनकार भागवत प्रकाश तिखांडके (वय 24) हे शेंडीवरुन उडदवणे येथे जात असताना रात्री 12.30 वाजता येताना ही घटना घडली. मात्र, त्याची झेप चुकली आणि दुचाकीच्या मागच्या बाजुला धडक बसली. बिबट्या आणि भागवत तिखांडके महाराज दोघंही रस्त्यावर पडून जखमी झाले.

दुचाकी सुरु करुन गाठलं घर : गुहिरे इथं कीर्तनाच्या कार्यक्रमावरुन उडदवणे गावी कीर्तनकार भागवत प्रकाश तिखांडके महाराज हे आपल्या दुचाकीवरुन रात्री परत जात होते. ते पांजरे शिवारात येताच येथील शिवारात एका झाडाच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर झेप घेऊन हल्ला केला. मात्र, त्याची झेप चुकल्यानं दुचाकी घसरुन रस्त्यावर पडली. त्यामध्ये दोघंही जखमी झाले. मोठा आवाज झाल्यानं बिबट्या जंगलात पळाला. भागवत तिखांडके महाराज यांच्या उजव्या, डाव्या हाताला पाठीवर गंभीर जखमा झाल्या. मात्र, त्याही अवस्थेत तिखांडके महाराज यांनी दुचाकी सुरु करुन घर गाठलं.

जखमींना मदत देण्याचं मान्य : तेथे पोहोचल्यावर आणि झाला प्रकार कळल्यावर त्यांना स्थानिकांनी खासगी दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. याबाबत वन्यजीव विभागाचे डी. डी. पडवळ यांनी "याबाबत चौकशी करुन जखमींना मदत देण्यात येईल. या परिसरातील रात्री अपरात्री फिरताना अथवा प्रवास करताना सतर्क रहावं," असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

हेही वाचा :

1 जागावाटपावरून शिवसेनेत कुरबुर; पाच जागांवर एक-दोन दिवसात तोडगा निघेल-संजय शिरसाट - Shivsena Meeting

2 एकनाथ खडसे करणार 'घरवापसी', खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक? - Eknath Khadse

3 निवडणूक आयोगाचा आयडी हॅक करुन आपच्या रॅलीचा अर्ज रद्द; 2 जणांना अटक तर एसडीएम निलंबित - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 7, 2024, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.