मुंबई Khwaja Yunus Custodial Death : ख्वाजा युनूस याचा 2002 मध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं मुंबईच्या अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश सचिन पवार यांच्या न्यायालयात याबाबत अर्ज दाखल केला. या अर्जात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचं त्यानं नमूद केलं आहे. 29 जानेवारी रोजी सचिन वाझेकडून हस्तलिखित अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
मुंबईतील बॉम्बस्फोटातील ख्वाजा युनूस आरोपी : मुंबईतील 2 डिसेंबर 2002 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात ख्वाजा युनूस याला चौकशीसाठी पोलीस घेऊन जात होते. यावेळी तो पळून गेला, असं पोलिसांनी त्यावेळेला म्हटलं होतं. परंतु तुरुंगातच ख्वाजा युनूस याचा मृत्यू झाल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं त्यावेळेला 14 पोलिसांवर आणि काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यात सचिन वाझेवर देखील आरोप आहे. ते प्रकरण प्रलंबित असल्यामुळं त्या खटल्यात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचा अर्ज माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं अतिरिक्त सत्र न्यायालयात केला आहे.
ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझे निलंबित : ख्वाजा युनूस प्रकरणामध्ये सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. या प्रकरणात अटक नव्हती झाली, त्यामुळं या संपूर्ण प्रकरणांमध्ये मी माफीचा साक्षीदार बनायला तयार आहे. मला माफीचा साक्षीदार म्हणून घेण्यात यावं, अशी विनंती करणारा हस्तलिखित अर्ज अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश सचिन पवार यांच्या न्यायालयात सोमवारी सचिन वाझेकडून सादर करण्यात आला आहे.
ख्वाजा युनूस प्रकरण 20 वर्षापासून प्रलंबित : सचिन वाझे यानं आपल्या माफीचा साक्षीदार बनवण्यासाठीच्या अर्जामध्ये म्हटलेलं आहे की, "ख्वाजा युनूस प्रकरण 20 वर्षापासून हे प्रलंबित आहे. त्यामध्ये माझ्यावर आरोप केला गेलेला आहे. तो आरोप म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर आहे. परंतु माझ्या उपजीविकेला आणि प्रतिष्ठेला त्यामुळं मोठी हानी पोहोचलेली आहे." आपल्या माफीचा साक्षीदारासाठीच्या अर्जामध्ये सचिन वाझे याच्याकडून हा देखील मुद्दा मांडला गेला आहे की, "सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण प्रलंबित आहे. त्याच्यावर अंतिम निकाल आलेलाच नाही. जवळजवळ पुढील काही वर्षात या खटल्यावर निकाल येण्याची शक्यताच नाही. त्यामुळं हा खटला कधी संपणारच नाही. परंतु मला त्या खटल्यातील ठेवल्या गेलेल्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. म्हणून या खटल्यामध्ये मी माफीचा साक्षीदार बनण्यास तयार आहे."
घाटकोपर बॉम्बस्फोटाचा ख्वाजा युनूसवर आरोप : घाटकोपर उपनगरात 2 डिसेंबर 2002 ला बॉम्बस्फोट झालेला होता. त्यात ख्वाजा युनूसवर आरोप ठेवण्यात आला होता. त्या आरोपाच्या निमित्तानं त्याला सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकारी छत्रपती संभाजीनगरला चौकशीसाठी घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाला. त्यात ख्वाजा युनूस पळून गेला असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यानंतर ख्वाजा युनूस याची चौकशी करत असताना तुरुंगातच त्याचा खून केला. खून केल्याचे पुरावे नष्ट केले, असा आरोप पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ठेवला गेला होता. त्याचा एफ आय आर देखील नोंदवला गेला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं हा एफ आय आर नोंदवला होता. यामध्ये सचिन वाझेसोबत इतर 14 पोलिसांवर आरोप ठेवण्यात आला होता.
हेही वाचा :